त.भा, प्रतिनिधी, मुंबई, दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आणि विद्यार्थी आंदोलनाच्या प्रचंड रेट्यानंतर अखेर पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र, फडणवीस यांच्या दिल्ली भेटीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठलाची शनिवारी पहाटे शासकीय महापूजा केली. त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरहून थेट दिल्लीला रवाना झाले. मात्र, नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंकडून मुंबईत तिरंगा मार्चची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.
देवेंद्रजी महाराष्ट्रातच राहणार : अमृता फडणवीस
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे पेंद्रीय नेतफत्व दिल्लीत बोलावून घेणार, अशी जोरदार चर्चा सुऊ आहे. फडणवीस दिल्लीत पेंद्रीय मंत्री होणार, असा चर्चाही सातत्याने सुऊ आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमफता फडणवीस यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिल्लीत जाण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत. आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे. मी देवेंद्रजी यांना महाराष्ट्रातच ठेवणार अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

