Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवी गल्ली, शहापूर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात

नवी गल्ली, शहापूर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात

बेळगाव : प्रभाग क्रमांक 27 मधील नवी गल्लीत काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक रवि साळुंखे यांनी आपल्या निधीतून सदर कामाला सुरुवात केल्याने रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून नवी गल्लीतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेकडे पाठपुरावा करून रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक रवि साळुंखे यांनी निधी मंजूर करून घेतला. सदर निधीतून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 27 मधील विविध गल्ल्यांमध्ये रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat