राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीतर्फे शिवतीर्थावर जोरदार निदर्शने
सातारा : देशातही बावीस लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या देशातील कुचकामी प्रशासनातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करत साताऱ्यात राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीतर्फे शिवतीर्थावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
नीट परीक्षा लागू केल्यापासून आत्तापर्यंत जवळपास सहा ते सात वेळा नीट आणि जेईईचा पेपर फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी परीक्षा झाली मात्र पेपर फुटी झाल्याचे समजताच संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
शिवतीर्थ पोवई नाका येथे कॉग्रेस महिला आघाडीतर्फे जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकार विरोधात पोस्टर झळकाविण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव धनश्री महाडिक, शिक्षण विभाग जिल्हाध्यक्ष श्रीकांत कांबळे, सेवादल महिला अध्यक्षा मालन परळकर, जिल्हा सरचिटणीस सादिक बागवान, युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव प्राची ताकतोडे, सातारा शहर उपाध्यक्षा माधवी वर्पे, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश शिंदे सातारा, एनएसयुआय उपाध्यक्ष धनराज जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव आणि विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

