Dailyhunt
नेतान्याहूंचा नवा 'वॉर प्लॅन'

नेतान्याहूंचा नवा 'वॉर प्लॅन'

ट्रम्प यांच्या युद्धविरामाला 'हाफ सीजफायर'मध्ये बदलले :लेबनॉनमध्ये पुन्हा हल्ला

राणसोबत 2 आठवड्यांचा युद्धविराम झाला असला तरीही लेबनॉनमधील संघर्ष थांबलेला नाही. इस्रायलच्या सैन्याने पुन्हा एकदा लेबनॉनचे दक्षिण किनारी शहर टायरच्या लोकांना त्वरित घर सोडून निघून जा अशी सूचना केली आहे.

इस्रायल याला 'हाय सीजफायर' ठरवत आहे, म्हणजेच अर्ध युद्धविराम आहे. इराणवरील हल्ले थांबविले असले तरीही इस्रायलने लेबनॉनमधील कारवाई जारी ठेवली आहे.

हाफ सीजफायरचा अर्थ

इस्रायल आणि अमेरिकेने 7 एप्रिल रोजी रात्री उशिरा इराणसोबत 2 आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला. परंतु इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने हा युद्धविराम लेबनॉनवर लागू होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ इराणसोबतचा संघर्ष थांबला असला तरीही लेबनॉनमधील हिजबुल्लाह विरोधातील इस्रायलची कारवाई जारी राहणार आहे. यालाच 'हाफ सीजफायर' म्हटले जातेय. जोपर्यंत लेबनॉनच्या दक्षिण भागातून हिजबुल्लाहची पूर्ण शक्ती समाप्त होत नाही तोवर आम्ही थांबणार नाही असे इस्रायलचे सांगणे आहे.

टायर शहराच्या लोकांना सूचना

इस्रायलच्या सैन्याने टायर शहराच्या रहिवाशांना त्वरित तेथू स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. इस्रायल सैन्याचे प्रवक्ते कर्नल अविचय अद्रई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक मॅपसोबत पोस्ट केली आहे. टायर शहराच्या शबरीहा भागातील रहिवाशांनी त्वरित स्वत:चे घर सोडून निघून जावे असे यात म्हटले गेले आहे. तसेच इस्रायलने एका खास इमारतीला लक्ष्य करत लवकरच हल्ला केला जाणार असल्याचे सांगितले आहे. टायर शहर लेबनॉनच्या दक्षिण भागात असून इस्रायलने पूर्ण दक्षिण लेबनॉनवर यापूर्वीच ब्लँकेट इवॅक्युएशन ऑर्डर (सर्वांना निघून जाण्याचा आदेश) जारी केला आहे. मागील अनेक आठवड्यांपासून इस्रायल वारंवार तेथे राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे असे सांगत आहे.

टायर शहरात काय घडतंय?

टायर आणि आसपासच्या भागांमध्ये इस्रायलने अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. शहराच्या अनेक हिस्स्यांमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहोत. तसेच कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून सामान्य नागरिकांना वारंवार इशारा देण्यात येत असल्याचे इस्रायलच्या सैन्याचे सांगणे आहे. टायर एक किनारी शहर असून तेथे हजारो लोक राहतात. हिजबुल्लाह या शहरातच स्वत:ची शस्त्रास्त्रs लपवून ठेवत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. हा पूर्ण भाग रिकामी व्हावा अशी इस्रायलची इच्छा आहे.

नेतान्याहूंचा स्पष्ट संदेश

इराणचा दोन आठवड्यांचा युद्धविराम लेबनॉनला व्यापत नाही. लेबनॉनच्या सीमेवर सुरक्षा सुनिश्चित करेपर्यंत आम्ही थांबणार नसल्याचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने वक्तव्य जारी करत स्पष्ट केले आहे. या वक्तव्यामुळे लेबनॉनमधील तणाव आणखी वाढला आहे. हा हाफ सीजफायर किती दिवस चालणार हे अद्याप स्पष्ट नाही. इस्रायल सातत्याने लेबनॉनच्या दक्षिण भागांना रिकामी करवू पाहत आहे. लेबनॉनचे लोक तेथून न हलल्यास इस्रायल स्वत:चे हल्ले तीव्र करू शकतो. दुसरीकडे लेबनॉनमध्ये लोक घाबरले असून हजारो परिवारांनी यापूर्वीच स्वत:चे घर सोडले आहे. आता टायर सारख्या मोठ्या शहरातूनही स्थलांतर सुरू झाले आहे.

इराणमधून भारतीयांनी त्वरित बाहेर पडावे

युद्धविरामानंतर भारत सरकारकडून दिशानिर्देश

भारताने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या स्वत:च्या नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर पडण्याची सूचना केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक दिशानिर्देश जारी केले आहेत. अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

क्षेत्रातील सुरक्षास्थितीची अनिश्चितता पाहता लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडण्याचा सल्ला तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी तेथे असलेल्या भारतीय नागरिकांना दिला आहे. कुठल्याही स्थितीत पूर्व मंजुरीशिवाय सीमेवर स्वतंत्र स्वरुपात प्रवास करणे टाळण्यावर दिशानिर्देशात जोर देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat