वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी इराण युद्धाला विरोध केला आहे. 'हे युद्ध लवकरात लवकर संपले पाहिजे, कारण सामान्य नागरिकांना याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागत आहे' असे ट्विट त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले आहे.
इराणविरोधी युद्ध अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीशिवाय सुरू करण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धाला कोणीही पसंती दर्शवली नव्हती. पण या युद्धाचा काहीही संबंध नसलेल्या लोकांना मोजावी लागत आहे, असे ममदानी म्हणाले. या युद्धात हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
तेरा अमेरिकन सैनिकही मारले गेले असून ते आपल्या कुटुंबाकडे कधीही परत येऊ शकणार नाहीत. या युद्धाचा परिणाम केवळ रणांगणापुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम सामान्य अमेरिकन नागरिकांवरही होत आहे. पेट्रोल आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाच्या कुटुंबांच्या बजेटवर ताण येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. होता.

