Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑफ-बिट.केपे वर्देची कमाल.

ऑफ-बिट.केपे वर्देची कमाल.

यंदाच्या 48 देशांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत लक्ष वेधून घेतलं ते दोन अनपेक्षित नावांनी…कुरासाओ नि केप वर्दे…त्यापैकी केप वर्देनं सर्व अंदाज मोडीत काढत स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवणारा सर्वांत लहान देश ठरून इतिहास रचलाय…

  • केप वर्देची गट फेरीतील अनपेक्षित वाटचाल शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाविऊद्धच्या गोलशून्य बरोबरीनं पूर्ण झाली. या निकालामुळं त्यांना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला…
  • आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील हे द्वीप राष्ट फुटबॉलच्या या भव्य मंचावर पहिल्यांदाच सहभागी झालंय हे विशेष…आपल्या मोहिमेच्या सुऊवातीलाच 2010 चे विजेते स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखून त्यांनी सर्वांना चकीत केलं….त्यानंतर, 1930 मधील पहिल्या विश्वचषकाचे विजेते असलेल्या उऊग्वेविऊद्ध पिछाडीवरून मुसंडी मारत त्यांनी सामना 2-2 असा बरोबरीत सोडवून आणखी एक धक्का दिला…
  • सौदी अरेबियाविऊद्धच्या सामन्यानंतर आपल्या देशाचा ध्वज अंगावर पांघरून जल्लोष करणारे केप वर्देचे प्रशिक्षक बुबिस्ता म्हणाले, 'संपूर्ण जगाला हे दाखवून देण्यासाठी आमचा संघ खूप उत्सुक होता. या टप्प्यावर पोहोचल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही हे सिद्ध केलंय की, आमचा देश जरी देश असला, तरी हव्या असलेल्या गोष्टींसाठी आम्ही जिद्दीनं लढतो'…
  • केप वर्देला तीन बरोबरींतून मिळालेल्या तीन गुणांमुळं ते स्पेनच्या मागं दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा सामना भारतीय वेळेनुसार 4 जुलै रोजी पहाटे मियामीत विद्यमान विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाशी होईल…
  • केप वर्देच्या या यशाची तयारी बऱ्याच काळापासून सुरू होती. त्यांनी परदेशात स्थायिक झालेल्या मूळ आपल्याच देशातील होतकरू फुटबॉलपटूंना संघात सामावून घेण्याची जी रणनीती अवलंबली ती कामी आली…गटातील शेवटच्या सामन्यात सौदी अरेबियाविऊद्ध गोलशून्य बरोबरी साधणाऱ्या त्यांच्या संघातील 11 खेळाडूंपैकी सहा खेळाडूंचा जन्म देशाबाहेर झालाय. त्यापैकी तिघे नेदरलँड्समध्ये, तर उर्वरित खेळाडू आयर्लंड प्रजात्ताक, फ्रान्स नि पोर्तुगालमध्ये जन्मलेले…
  • केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोजिन्या हा त्यांच्या पहिल्यावहिल्या विश्वचषक मोहिमेचा खरा नायक…त्यानं तीन सामन्यांत दोनदा प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्यापासून रोखलं. विशेष म्हणजे युरोपियन विजेत्या स्पेनविऊद्धच्या गोलशून्य बरोबरीच्या सामन्यात त्यानं सात उत्कृष्ट बचाव केले आणि प्रतिभावान यामाललाही गोल करण्याची संधी नाकारली…
  • गोलपोस्टसमोरच्या त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळं तो सोशल मीडियावर रातोरात लोकप्रिय झालाय. त्याच्या 'इन्स्टाग्राम फॉलोअर्स'ची संख्या 5 लाखांवरून थेट 1.74 कोटींवर पोहोचलीय…हा आकडा 'एनएफएल'मधील दिग्गज खेळाडू टॉम ब्रॅडी आणि 'एनबीए स्टार' व्हिक्टर वेम्बान्यामा यासारख्या जगातील काही अत्यंत प्रसिद्ध खेळाडूंच्या 'फॉलोअर्स'च्या संख्येपेक्षाही अधिक…
  • वोजिन्या (ज्याचं खरं नाव आहे जोसिमार जुजे एवोरा डायस) याच्याव्यतिरिक्त केप वर्देचा सेंटर-बॅक दिनी बोर्जेस आणि मिडफील्डर केविन पिना यांनीही त्यांच्या आतापर्यंतच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलीय. पिनानं एक गोलही केलाय…

- राजू प्रभू

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat