Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्ट्रेलियाला 4-2 ने हरवून आगेकूच

ऑस्ट्रेलियाला 4-2 ने हरवून आगेकूच

बाद फेरीतील इजिप्तचा पहिला विजय ; पेनल्टी शूटआऊटमध्ये इजिप्तचे मारली बाजी

वृत्तसंस्था, आर्लिंग्टन, टेक्सास : शुक्रवारी झालेल्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये होसाम अब्देलमजीदने निर्णायक गोल केला आणि ऑस्ट्रेलियाचा 4-2 असा पराभव करून इजिप्तने विश्वचषकाच्या बाद फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला.

अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात मूळ गोलरक्षक पॅट्रिक बीचच्या जागी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू रायनला इजिप्तचा एकही फटका रोखता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी हॅरी साउटरने शूटआउटची सुऊवात चेंडू गोलपोस्टच्या वर मारून केली, तर 18 वर्षांच्या लुकास हेरिंग्टनचा चौथा प्रयत्न गोलपोस्टच्या आडव्या दांड्याला लागला. यामुळे इजिप्तच्या अब्देलमजीदला विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल करण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 वेळा खेळूनही ज्याच्या नावावर एकही गोल नव्हता त्या 25 वर्षीय अब्देलमजीदने चेंडू डाव्या बाजूला खालच्या दिशेने मारला. त्याच वेळी रायन उजव्या बाजूला झेपावला, ज्यामुळे स्टेडियममधील 70,244 प्रेsक्षकांमध्ये प्रचंड जल्लोष सुरू झाला. इजिप्तसाठी शूटआउटमध्ये गोल करणारे इतर खेळाडू महमूद साबेर, रामी राबिया आणि सालाह हे होते. सालाह गटातील शेवटच्या सामन्यात धोंडशिरेची दुखापत होऊनही या सामन्यातील नियमित आणि अतिरिक्त वेळेत पूर्णपणे खेळला खेळला. ऑस्ट्रेलियासाठी जॅक्सन इर्विन आणि अवर माबिल यांनी शूटआउटमध्ये गोल केले.

नियमित वेळेत 13 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करून इमाम अशूरने इजिप्तला आघाडी मिळवून दिली. त्याने हाणलेला चेंडू गोलरक्षक बीचला चकवून जाळ्यात गेला. 55 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने सामना बरोबरीत आणला. इजिप्तचा हा चौथा विश्वचषक सहभाग आहे दुसरीकडे, बाद फेरीत ऑस्ट्रेलियाची कामगिरी आता 0-3 अशी झाली आहे.

इजिप्शियन फुटबॉलमधील आपल्या भविष्याबाबत मोहम्मद सालाह काहीही निर्णय घेवो, तरीही हा स्टार आघाडीपटू आता अभिमानाने सांगू शकतो की, देशाच्या बाद फेरीतील पहिल्या विजयाच्या वेळी तो कर्णधार होता. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीपूर्वी गट फेरीतील सामन्यात न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव करण्यापूर्वी इजिप्तच्या नावावर विश्वचषकात एकही विजय नव्हता.

मोहम्मद हानी ठरला विश्वचषकात दोन स्वयंगोल करणारा पहिला खेळाडू

ऑस्ट्रेलियाने बरोबरी साधली त्यावेळी इजिप्तचा बचावपटू मोहम्मद हानी एकाच विश्वचषकात दोन स्वयंगाल करणारा पहिला खेळाडू ठरला. जेव्हा एडेन ओ'नीलने पेनल्टी क्षेत्राच्या डाव्या बाजूने 'फ्री-किक' घेतली तेव्हा हानीने चेंडूला हेडर मारला. मात्र चेंडू गोलरक्षक मुस्तफा शौबीरला चकवून स्वत:च्याच गोलजाळीत गेला आणि हानीचे नाव विश्वचषकाच्या इतिहासात अशा प्रकारे नकोशा कारणास्तव नोंदवले गेले. याआधी गट फेरीतील बेल्जियमविऊद्धच्या सामन्यातही त्याने एक स्वयंगोल केला होता. तो सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat