Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'फेरारी'ची पहिली ईव्ही स्पोर्ट्स कार 'लूस'लाँच

'फेरारी'ची पहिली ईव्ही स्पोर्ट्स कार 'लूस'लाँच

पूर्ण चार्जवर 530 किमी धावणार असल्याचा दावा : सुरुवातीची किंमत 6.10 कोटी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इटालियन लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता फेरारीने, 26 मे रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लॉन्च केली आहे.

ही एक 4-दरवाजी, 5-सीटर इलेक्ट्रिक जीटी कार आहे, जी वेगासोबतच लक्झरीची आवड असणाऱ्या लोकांसाठी डिझाइन केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, पहिली ईव्ही असण्यासोबतच, फेरारी लूस ही पहिली 5-सीटर कार देखील आहे.

ही कार अॅपलचे माजी डिझाइन प्रमुख जॉनी आयव्ह यांच्या 'लव्हफ्रॉम' या कंपनीने डिझाइन केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार पूर्ण चार्जवर 530 किमी धावेल आणि तिचा टॉप स्पीड 310 किमी प्रति तास आहे. फेरारी लूसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख युरो (रु. 6.10 कोटी) आहे. जगभरात कार बुकिंग सुरू झाले आहे. भारतीय बाजारपेठेत याच्या लॉन्चबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु नजीकच्या भविष्यात आयातीच्या मार्गाने हे भारतात आणले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.

आकारमान: ही फेरारी आतापर्यंतची सर्वात लांब कार आहे. तिची लांबी 5026 मिमी आहे, जी पुरोसाइंगवेपेक्षा 53 मिमी जास्त आहे. तिची रुंदी 1999 मिमी आणि उंची 1544 मिमी आहे.

वायुगतिकी: या कारमध्ये व्हर्टिकल वायपर्स आहेत जे हवेचा प्रवाह सुधारतात. तिचा ड्रॅग कोएफिशिएंट (0.254सीडी) कोणत्याही फेरारी रोड कारपेक्षा सर्वात कमी आहे.

चाके: यात समोर 23-इंच आणि मागे 24-इंच अलॉय व्हील्स मिळतात, जे फेरारीच्या इतिहासातील सर्वात मोठे आहेत.

लूक: या कारचे डिझाइन टू-पीस आहे, ज्यात ग्लॉस ब्लॅक पॅसेंजर सेलवर अॅल्युमिनियमचे बाह्य आवरण आहे. मागील बाजूस, सिग्नेचर क्वाड सर्क्युलर टेल लॅम्प्स दिले आहेत.

इंटिरियर: अॅपल लूक आणि रेट्रो थीमचे मिश्रण.

जोनी इव्हची 'अॅपल अॅस्थेटिक्स' कारच्या आत स्पष्टपणे दिसून येते. यात अॅनोडाइज्ड अॅल्युमिनियम आणि कॉर्निंग ग्लासचा वापर केला आहे.

5-सीटर लेआउट: ही पहिली फेरारी आहे ज्यात 5 लोक बसू शकतात. यात मागील बाजूस सुसाइड डोअर्स आहेत.

डॅशबोर्ड: क्रीनऐवजी, यात फिजिकल बटन्स आणि अॅनालॉग फीलला प्राधान्य दिले आहे. स्टीयरिंग व्हील 1950-60 च्या दशकातील फेरारी कार्सपासून प्रेरित आहे.

डिस्प्ले: ड्रायव्हरसाठी 12.5-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो 8-लेयर ओएलईडी क्रीनने बनलेला आहे. मध्यभागी 10-इंचाची आयपॅडसारखी इन्फोटेनमेंट क्रीन आहे, जी बॉल-अँड-सॉकेट जॉइंटच्या मदतीने पॅसेंजरच्या दिशेने फिरवता येते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat