Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फिल सॉल्ट मायदेशी रवाना

फिल सॉल्ट मायदेशी रवाना

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघातील सलामीचा धडाकेबाज फलंदाज फिल्ड सॉल्ट जखमी झाल्याने तो आता सध्या सुरू असलेल्या 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील आपल्या संघाच्या शेवटच्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही.

दुखापत झालेल्या हाताच्या बोटावर वैद्यकीय इलाज करुन घेण्यासाठी तो इंग्लंडला रवाना झाला आहे.

फिल सॉल्टच्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीचे स्वरुप मात्र आरसीबीकडून गुप्त ठेवण्यात आले आहे. डाव्या हाताच्या बोटाला ही दुखापत झाली. 18 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध बेंगळूरमध्ये झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेंडू थोपविण्यासाठी त्याने सूर मारताना त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला ही दुखापत झाली होती. आता ब्रिटनमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat