Dailyhunt
'फिफा'कडून विश्वचषकासाठी पिवळ्या कार्डासंदर्भात नवीन नियम

'फिफा'कडून विश्वचषकासाठी पिवळ्या कार्डासंदर्भात नवीन नियम

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

हत्त्वाच्या बाद फेरीच्या सामन्यांवेळी कमी खेळाडू निलंबित व्हावेत यासाठी फिफाने पिवळ्या कार्डांसंदर्भातील विश्वचषक नियमांमध्ये बदल केला आहे. उत्तर अमेरिकेत होणाऱ्या विस्तारित स्पर्धेदरम्यान दोनदा पिवळे कार्ड मिळालेल्या खेळाडूंची शिस्तभंगाची नोंद पुसून त्यांना अतिरिक्त माफी देण्याचा प्रस्ताव फिफाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला.

नंतर फिफाने एक निवेदन जारी करून या बदलाची पुष्टी केली. त्यात म्हटले आहे की, अतिरिक्त बाद फेरीसह विस्तारित स्वरूप लक्षात घेता फिफा मंडळाने फिफा विश्वचषक 2026 च्या नियमांमध्ये एका दुऊस्तीला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार अंतिम सामन्यातील एकेरी पिवळे कार्ड गट फेरीनंतर आणि पुन्हा पिवळे कार्ड मिळाल्यास ते उपांत्यपूर्व फेरीनंतर रद्दबातल ठरवले जाईल. विश्वचषकात खेळाडूंना दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये पिवळे कार्ड मिळाल्यास एका सामन्याची बंदी भोगावी लागते, परंतु मागील काही स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीनंतर एकेरी पिवळे कार्ड रद्द केले जात होते. त्यामुळे उपांत्य फेरीत पिवळे कार्ड मिळाल्यास कोणताही खेळाडू निलंबनामुळे अंतिम सामन्यास मुकणार नाही हे सुनिश्चित होत होते.

48 संघांच्या विस्तारित विश्वचषक स्वरूपामुळे, ज्यामध्ये 32 संघांच्या अतिरिक्त बाद फेरीचा समावेश असले, खेळाडूंना मैदानावर टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने फिफाने पुनरावलोकन केले आहे. तीन सामन्यांच्या गट फेरीनंतर ज्या खेळाडूंना एक पिवळे कार्ड मिळाले आहे, त्यांची शिस्तभंगाची नोंद रद्द होईल, जेणेकरून ते बाद फेरी नव्याने सुरू करू शकतील. उपांत्यपूर्व फेरीनंतर तीन बाद फेऱ्यांमध्ये ज्या खेळाडूंना एक पिवळे कार्ड मिळाले असेल आणि ज्यांचे संघ उपांत्य फेरीत पोहोचलेले असतील, त्यांच्यासाठी दुसरी माफी लागू होईल. फिफाने मंगळवारी विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व 48 संघांना वितरित केल्या जाणाऱ्या आर्थिक संसाधनांमध्ये आणखी 15 टक्के वाढ जाहीर केली, जी एकूण 871 दशलक्ष डॉलर्स किंवा प्रत्येक संघाला 18 दशलक्ष डॉलर्सपेक्षा थोडी जास्त असेल. विश्वचषक 11 जून ते 19 जुलैदरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळला जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat