Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फ्रान्सची डायने पॅरी विजेती

फ्रान्सची डायने पॅरी विजेती

वृत्तसंस्था, पॅरिस

ब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या माँटेरी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या 23 वर्षीय डायने पॅरीने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना बेल्जियमच्या द्वितीय मानांकित इलेसी मर्टन्सला पराभूत केले.

डब्ल्यूटीए टूरवरील या 500 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात पॅरीने मर्टन्सचा 6-4, 0-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. या लढतीमध्ये पॅरीने पहिला सेट 6-4 असा जिंकून मर्टन्सवर आघाडी मिळवली. पॅरीने बेसलाईन खेळावर अधिक भर देत तसेच दोन वेळा मर्टन्सची सर्व्हिस भेदत हा सेट जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये मर्टन्सचा खेळ अधिक अचूक आणि वेगवान झाल्याने तिने आपल्या फोरहँड फटक्यावर पॅरीला वारंवार नेटजवळ खेचले.

त्यामुळे पॅरीकडून वारंवार चुका झाल्या. या सेटमध्ये पॅरीला एकही गेम जिंकता आला नाही. बेल्जियमच्या मर्टन्सला तिसऱ्या सेटमध्ये मात्र आपली सर्व्हिस अधिक वेळ राखता आली नाही. त्यामुळे पॅरीने हा शेवटचा सेट 6-3 असा जिंकून मर्टन्सचे आव्हान संपुष्टात आणले. आता अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत फ्रान्सच्या पॅरीचा पहिल्या फेरीतील सामना सोमवारी स्विसच्या गोलूबिकशी होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat