बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून प्रमोद पालेकर संघाने बेळगाव रॉयल सीसी संघाचा 6 गड्यांनी तर युनायटेड सीसी संघाचा बीसीसी मच्छे संघाचा 3 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले.
वासीम मतवाले व अक्रम पिरजादे यांना सामनावीर तर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मेहेर व कल्पेश संभाजी यांना गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव रॉयल्स सीसीने प्रथम फलंदाजी करताना 17.1 षटकांत सर्वगडी बाद 79 धावा केल्या.
निताथने 1 षटकार, 2 चौकारांसह 25 तर सिप्तनने 2 चौकारासह 17 धावा केल्या. प्रमोद पालेकरतर्फे वासीमने 16 धावांत 5, प्रमोद व अजीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. त्यानंतर प्रमोद पालेकर संघाने 7.4 षटकांत 4 गडीबाद 80 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. संतोष जाधवने 5 चौकारांसह 25, भूषणने 4 षटकार, 3 चौकारांसह 37 तर अनिकेत भोसलेने 11 धावा केल्या. बेळगाव रॉयल्सतर्फे मेहेरने 3 तर नितथने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात युनायटेड सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी बाद 157 धावा केल्या. कल्पेश संभाजीने 9 चौकारांसह 53, सुरेंद्रने 3 चौकारांसह 30, समर्थने 29 तर उमेश गोरलने 12 धावा केल्या. मच्छेतर्फे आक्रमने 16 धावांत 3, मोहसीनने 36 धावांत 3 तर मुस्तफीरने 1 गडी बाद केला.

