Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राजस्थान रॉयल्स आज सर्वस्व पणाला लावणार

राजस्थान रॉयल्स आज सर्वस्व पणाला लावणार

वृत्तसंस्था

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील शेवटचे स्थान पटकावण्याच्या प्रयत्नात राजस्थान रॉयल्स आज रविवारी मुंबईत संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना करताना आपली सर्व ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करतील.

वानखेडे स्टेडियमवर रविवारी उष्ण आणि दमट वातावरणात दुपारच्या वेळी होणारा हा सामना दोन्ही संघांच्या चिकाटीचा आणि शारीरिक तंदुऊस्तीचा कस पाहणारा ठरेल. मुंबई इंडियन्स या हंगामाचा शेवट एका दिलासादायक विजयाने' करण्याची आशा बाळगून आहेत, तर राजस्थान रॉयल्सला हे पक्के ठाऊक आहे की, त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केवळ विजयाचीच गरज आहे.

राजस्थान रॉयल्स सध्या 14 गुणांसह चौथ्या स्थानावर असून त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव करणे अनिवार्य आहे. यामुळे त्यांचे गुण 16 वर पोहोचतील आणि ते प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या पंजाब किंग्स (13 गुण) व कोलकाता नाईट रायडर्स (13 गुण) या दोन्ही संघांपेक्षा किमान एका गुणाने तरी आघाडीवर राहतील. पण जर रविवारी राजस्थानचा पराभव झाला, तर त्यांना अशी आशा करावी लागेल की, पंजाब आणि नाईट रायडर्स या दोन्ही संघांचाही त्यांच्या शेवटच्या सामन्यांमध्ये पराभव होईल. तसे झाले, तरच जयपूरस्थित या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी संधी मिळू शकेल.

रॉयल्सने त्यांच्या मागील पाच सामन्यांमध्ये विजयापेक्षा पराभवाचाच अधिक सामना केला आहे. तरीही वानखेडे स्टेडियमच्या लहान सीमा आणि खेळपट्टीची स्थिती लक्षात घेता मुंबईविऊद्धच्या सामन्यात विजयाची आपली संधी नक्कीच उज्ज्वल असल्याचे त्यांना वाटेल. फलंदाजीच्या सुऊवातीला वैभव सूर्यवंशी करत असलेल्या आक्रमक फटकेबाजीपेक्षाही यशस्वी जैस्वाल हाच मुंबई इंडियन्ससाठी सर्वांत मोठा धोका ठरण्याची शक्यता आहे. भारताचा सलामीवीर आणि स्थानिक खेळाडू असलेल्या जैस्वालने गुवाहाटीमध्ये जसप्रीत बुमराह आणि त्याच्या सहकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याने केवळ 32 चेंडूंत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली होती, ज्यामुळे सामन्याचा निकाल पहिल्याच टप्प्यात निश्चित झाला होता.

जैस्वाल पुन्हा त्याच मैदानावर परतत आहे, जिथे त्याने तीन वर्षांपूर्वी आपले पहिले आयपीएल शतक झळकावले होते. त्यानंतरच्या वर्षी याच प्रतिस्पर्ध्याविऊद्ध खेळताना त्याने आपले दुसरे शतक पूर्ण केले. तरीही राजस्थानला आपला कर्णधार रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांच्याकडून अधिक सातत्याची अपेक्षा असेल. हे दोन्ही खेळाडू फलंदाजीच्या क्रमात अत्यंत महत्त्वाच्या स्थानांवर खेळतात, परंतु मधल्या षटकांमध्ये संघाला आवश्यक असलेला वेग देण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही.

सध्याच्या फॉर्मचा विचार करता राजस्थानचा संघ अधिक धोकादायक वाटतो. त्यांचे अनेक खेळाडू सध्या भरात असल्याने आणि गरजेच्या वेळी चांगली कामगिरी करण्यास सज्ज असल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. मुंबईसाठी दिलासादायक बाब इतकीच की, गेल्या पाच सामन्यांमधील त्यांची कामगिरी राजस्थानसारखीच म्हणजे तीन पराभव आणि दोन विजय अशी आहे. हा सामना मुंबईचे संघर्ष करणारे भारतीय संघातील खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना छाप पाडणारी कामगिरी करण्याची आणि त्याद्वारे संघाला या हंगामाचा शेवट सकारात्मकरीत्या करण्यास मदत करण्याची एक अखेरची संधी उपलब्ध करून देईल

संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकल्टन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रघू शर्मा.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, डोनोव्हन फेरेरा, रवी सिंग, शुभम दुबे, दासुना शनाका, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat