Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Real Estate Fraud | ९८ लाख ९६ हजारांची फसवणूक; रिअल इस्टेट कंपनीचा संचालक अन् एजंट जेरबंद

Real Estate Fraud | ९८ लाख ९६ हजारांची फसवणूक; रिअल इस्टेट कंपनीचा संचालक अन् एजंट जेरबंद

Real Estate Fraud - ९८ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या लाईफमार्क रियल इस्टेट अँड डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीचा संचालक वैभव वामन जोशी वय ३२ आणि त्याच्या साथीदार एजंटं रुपेश दत्ता गायकवाड, वय ३५, यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

सन २०२१ ते २०२३ या कालावधीत वैभव वामन जोशी व त्याच्या इतर साथीदारांनी कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूक दारास त्याच्या गुंतवणुकीच्या १० टक्के परतावा दरमहा देण्यात येईल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी गुंतवणूक केली. मात्र ठरलेला परतावा न देता संचालक वैभव जोशी व त्याच्या सहकाऱ्यांनी ९८ लाख ९६ हजारांची फसवणूक केली. याबाबत. मनोज गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी वैभव जोशी व त्याचे साथीदार फरार झाले होते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व अंमलदारांचे पथक तयार करूनसमांतर तपास सुरू केला. तपासात सर्व आरोपी राहत्या पत्त्यावर न राहता बाहेरगावी निघून गेल्याचे समजले. वैभव जोशी याने पाचगाव येथील राहते घर विकून आपले नाव बदलून वैभव पाटील या नावाने वास्तव्य केल्याचे उघड झाले.

तपास पथकाने माहिती मिळवून उद्यमनगर येथे सापळा लावून वैभव वामन जोशी उर्फ वैभव वामन पाटील यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर साथीदार रुपेश दत्ता गायकवाड हा घरी असल्याची माहिती मिळाली. त्यालाही पाचगाव येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशांत चव्हाण, जालिंदर जाधव, युवराज पाटील, शुभम संकपाळ, योगेश गोसावी, अमित सर्जे, सतीश जंगम, संजय पडवळ यांच्या पथकाने केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat