आमदार रोहित पवारांची भाजपवर टीका
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूधउत्पादक संघ अर्थात गोकुळबर तब्बल ६३ वर्षानंतर पहिल्यांदा प्रशासकीय मंडळाची नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात राजकारण करता यावे आणि सहकार चळवळ नको असल्याने भाजपकडून सहकार चळवळ संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
कोल्हापुरात प्रसिध्द माध्यमांशी बोलताना त्यांनी भाष्य केले.
आमदार पवार म्हणाले,महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लाभ होत आहे. मात्र भाजपला ही सहकार चळवळच मोडीत काढायची आहे. यामुळे गोकुळवर प्रशासक आणला आहे. महाराष्ट्रात दर दोन तासाला महिला, मुलीबर अत्याचार होत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या लग्नसमारंभाला जाण्यासाठी वेळ आहे पण पुण्यातीलपीडितेच्या कुटुंबाला त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही अशी टीका केली.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता येताच गुंडागिरी वाढली असून टीएमसीचे कार्यालय फोडण्यात आले आहे. या गुंडागिरीच्या माध्यमातून भाजपा सत्तेचा विकास करणार आहे का? असा सवाल केला. पाच राज्यातील निवडणुकानंतर गॅसच्या किंमती वाढल्या असून महागाई वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बारामतीच्या पोटनिवडणूक निकालातून जनतेचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित दादांवर असणारे प्रेम स्पष्ट दिसून आल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली आहेत.

