Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sahyadri Express Robbery सह्याद्री एक्सप्रेसमध्ये लुटीचा थरार, फलाट क्रमांक एकवर महिलेचे पर्स व दुसऱ्या फलाटावर दागिने लांबवले

Sahyadri Express Robbery सह्याद्री एक्सप्रेसमध्ये लुटीचा थरार, फलाट क्रमांक एकवर महिलेचे पर्स व दुसऱ्या फलाटावर दागिने लांबवले

प्रतिनिधीमिरज

ध्य रेल्वेच्या भिलवडी स्थानकावर कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर या अपडाऊन सह्याद्री एक्सप्रेस रेल्वेला चोरट्यांनी लक्ष केले. मिरजेतून जाणारी गाडी फलाट क्रमांक एकवर थांबल्यानंतर खिडकीतून हात घालून महिलेची पर्स लंपास केली.

तर पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री एक्सप्रेस फलाट क्रमांक दोनवर थांबलेली असताना अंधाराचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण चोऊन नेले.

येता-जाता सह्याद्री एक्सप्रेसला टार्गेट कऊन चोरट्यांनी लुटीचा थरार केल्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिरज लोहमार्ग आणि पुणे लोहमार्ग पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, भिलवडी स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून निघालेली सह्याद्री एक्सप्रेस (गाडी क्र. 01024) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मिरजेत आली. तिथून निर्धारीवेळत पुण्याकडे रवाना झाल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता ही रेल्वे भिलवडी स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर थांबली. यावेळी फलाटाकवर काही ठिकाणी अंधारात होता.

अंधाराच्या जागी असलेल्या बोगीच्या खिडकीजवळ अनोळखी चोरटे येऊन थांबले होते. यावेळी खिडकीजवळ महिला प्रवाशी छाया अजय सोनेकर (रा. पुणे) बसल्या होत्या. चोरट्यांनी खिडकीतून हात घालून छाया सोनकर यांच्याकडील असलेली पर्स काढून घेतली. व छाया या आरडाओरडा करतानाच चोरटे अंधारातून पळून गेले. या पर्समध्ये विवो कंपनीचा मोबाईल, चष्मा, गॉगल, घड्याळ आणि ब्लूटूथ, असा एकूण 44 हजार ऊपये किंमतीचा मुद्देमाल होता.

फलाट क्र. एकवर चोरीची घटना ताजी होती. पोलिस चोरट्यांचा शोधही घेत होते. तेवढ्यात मध्यरात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून निघालेली पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस भिलवडी स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर येऊन थांबली होती. तेथेही अंधार होता. यावेळी अज्ञात चोरटे पुन्हा बोगीजवळ येऊन थांबले होते. तेवढ्यात भिलवडीचीच माहेरवाशीन असलेली एक महिला उतरली. ती अंधारातून जात असताना अज्ञात चोरटे पाठीमागून आले. त्यांनी महिलेला हिसडा माऊन तिच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे सोन्याचे गंठण लंपास केले.

रोख रक्कमही लंपास

तसेच अन्य दोन प्रवाशांनाही अशाच प्रकारे हिसडा माऊन काही रोख रक्कमही लंपास करण्यात आली. प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होताच, चोरटे पुन्हा अंधारातून पसार झाले.
घडल्या प्रकाराबाबत संबंधीत प्रवाशांनी मिरज लोहमार्ग आणि पुणे लोहमार्ग पोलिसात वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत. एकाच स्थानकावर वेगवेगळ्या फलाटांवर एकाच अपडाऊन सह्याद्री एक्सप्रेसला चोरट्यांनी लक्ष कऊन लुटमारीचा थरार केल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

भिलवडी स्थानकावर लाईट नाही, सीसीटीव्ही नाही, याचा अंदाज घेउढन चोरट्यांच्या टोळीने हा लुटीचा थरार केला. प्रवाशांची लुटमार करणारे हे स्थानिक चोरटे असल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून केला जात आहे.

शेणोली घटनेची पुनरावृत्ती
काही दिवसांपूर्वीच भिलवडी स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या शेणोली स्थानकाजवळ सिग्नलवर कापड झाकून सह्याद्री एक्सप्रेसमध्ये लुटमार झाली होती. तेव्हाही बंद असलेल्या सीसीटीव्ही आणि अंधाऱ्या रात्रीतून पळून गेलेले चोरटे याचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आले होते. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विशेष रेल्वेला शेणोलीपासून पुढे लुटाऊंच्या टोळीकडून लक्ष केले जात असल्याची दहशत प्रवाशांमध्ये होतीच. त्याचीच पुनरावृत्ती भिलवडी स्थानकावर घडली.

महत्त्वाच्या एक्सप्रेस गाडीला मध्यरात्रीच्या सुमारास भिलवडी स्थानकावर थांबा असूनही तेथे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही उपाययोजना नाहीत. फलाटांवर अंधार आणि बंद पडलेल्या सीसीटीव्ही याचा पुरेपूर फायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेणोली घटनेतील चोरटे अद्याप सापडले नाहीत. आता भिलवडी स्थानकावर चोरी करुन पळून गेलेल्या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

अंधार.. अन् बोगीच्या खिडकीजवळ झटापट
रिमझीम पावसामुळे हवेत प्रचंड गारवा होता. भिलवडी स्थानकावर रेल्वे आल्यानंतर लाईटाही नव्हत्या. गाडी भिलवडीत थांबते, पण जास्त प्रवाशी उतरत नाहीत. गाडी पाच ते दहा मिनिटे थांबली होती. खिडकीजवळ हालचाली जाणवत होत्या. पण अंधारामुळे कोणी डोकावले नाही. तेवढ्यात खिडकीतून हात आले.

पर्स व गळ्यात हिसडा माऊन लुटालूट सुरू झाली. घाबरलेल्या महिलांनी जोरात आरडाओरडा करतानाच चोरटे हाती लागेल तो ऐवज घेऊन अंधारातून पळून गेले, अशी आपबिती तक्रारदार प्रवाशी महिलेने सांगितली. भिलवडी स्थानकावर तातडीची मदतही मिळाली नाही. पोलिसही नव्हते. त्यामुळे घाबरलेल्या महिलांनी कराड स्थानकावर उतऊन पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल कऊन तपासासातून तो मिरज लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat