Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
साखरेचा तुटवडा; D-Mart, Blinkitसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदीला मर्यादा

साखरेचा तुटवडा; D-Mart, Blinkitसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदीला मर्यादा

वी दिल्ली : सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असताना देशातील किरकोळ बाजारात साखरेच्या उपलब्धतेवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी D-Martसह BigBasket, Blinkit आणि Swiggy Instamartसारख्या प्लॅटफॉर्मवर काही साखर उत्पादनांच्या खरेदीवर मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत.

विविध प्लॅटफॉर्मवर ही मर्यादा साधारण 3 ते 5 किलोपर्यंत असल्याचे वृत्त आहे.
गेल्या दोन महिन्यांत किरकोळ साखरेच्या किमतीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार वाढला आहे. सणासुदीच्या काळात घरगुती वापरासोबत मिठाई, बेकरी आणि खाद्यपदार्थांच्या उद्योगाकडूनही साखरेची मागणी वाढत असल्याने पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी मर्यादा लागू केल्या आहेत.

दरम्यान, साखरेचा तुटवडा असल्याची चर्चा असली तरी केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशात सध्याच्या मागणीसाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहणे, सणासुदीची वाढती मागणी, जागतिक बाजारातील परिस्थिती आणि काही ठिकाणी साठेबाजी यामुळे अलीकडील दरवाढीवर दबाव आला आहे.

दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. तसेच साखर व्यापाऱ्यांच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आली असून, साठेबाजी रोखण्यासाठी तपासणीही सुरू आहे.
आगामी सणासुदीच्या काळात मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने साखरेच्या किमती आणि उपलब्धतेवर ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आयात केलेली साखर आणि अतिरिक्त साठा बाजारात आल्यास पुरवठा सुधारून दरांवरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat