Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समुद्राच्या लाटांनी 'बीच' केला गायब

समुद्राच्या लाटांनी 'बीच' केला गायब

मेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात मागील काही दिवसांपासून समुद्राच्या मोठ्या लाटांनी किनारी भागांमध्ये मोठे नुकसान केले आहे. लाँग बीच पेनिनसुलामध्ये लाटांनी वाळूचा थर आणि समुद्राला रोखणाऱ्या भिंतीला पार केले, यामुळे बोर्डवॉकचे अनेक हिस्से तुटले आणि किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.

कमीतकमी 24 घरांना रिकामी करविण्याचा आदेश देण्यात आला. आगामी महिन्यांमध्ये मजबूत अल-नीनोची शक्यता वर्तविण्यात आली असताना हा प्रकार घडला आहे.

हरिकेन मॅरीनंतर उठलेल्या तीव्र लाटांचा प्रभाव मालिबूपासून सॅन दिएगोपयंत दिसून आला. डाना पॉइंटमध्ये लाटांमुळे अनेक समुद्र किनाऱ्यांवर निर्मित घरांना नुकसान पोहोचले. सॅन क्लेमेंटमध्sय समुद्राच्या आक्रमणामुळे किनारी रेल्वेमार्ग पुन्हा बंद करावा लागला. मालिबूमध्ये समुद्र किनारी एका घराच्या ड्राइव्हवेमध्ये मोठा ख•ा निर्माण झाला. तर पॅसिफिक कोस्ट हायवेच्या काही हिस्स्यांपर्यंत समुद्राचे पाणी पोहोचले आहे. अनेक ठिकाणी तीव्र लाटांसोबत समुद्राची भरती देखील अत्यंत उंच राहिली. नॅशनल वेदर सर्व्हिसने किनारी भागांमध्ये तीव्र लाटा आणि पूरावरून इशारा जारी केला. जे नुकसान झाले, ते आगामी काळात वाढणाऱ्या धोक्याचा संकेत असू शकते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

लाँग बीचमधील वाळू गायब

लाँग बीच पेनिनसुलामध्ये तीव्र लाटांमुळे समुद्र किनारी जमा वाळू बऱ्याचअंशी वाहून गेली आहे. ही वाळू समुद्राच्या लाटांना घरे आणि बोर्डवॉकपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यास मदत करते. वाळू हटल्यावर लाटा थेट समुद्राला रोखणारी भिंत आणि त्याच्या मागील भागापर्यंत पोहोचल्या आहेत. समुद्र पूर्वी कधीकधी भिंतीवरील बोर्डवॉकपर्यंत पोहोचायचा, परंतु यावेळी स्थिती वेगळी होती. लाटा पूर्वीपेक्षा अधिक तीव्र होत्या आणि समुद्र घरांच्या अत्यंत नजीक आला. अनेक घरांना नुकसान पोहोचले आणि ठिकठिकाणी गाळ फैलावला. पूर्वी बोर्डवॉकसमोर मोठ्या प्रमाणात वाळू दिसायची, परंतु आता समुद्र अनेक फूट आणखी जवळ आल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.

इतर भागांमध्येही नुकसान

डाना पॉइंटमध्ये तीव्र लाटांमुळे अनेक समुद्र किनारी वसलेल्या घरांना नुकसान पोहोचले. अधिकाऱ्यांनी 7 घरांना राहण्यासाठी असुरक्षित ठरविले. तर आणखी दोन घरांवरून सुरक्षेची चिंता व्यक्त करण्यात आली. सॅन क्लेमेंटेमध्ये किनारी रेल्वेमार्ग पूर्वीपासूनच समुद्राच्या आक्रमणाच्या समस्येला तोंड देत आहे. यावेळी तीव्र लाटा आणि उंच भरतीमुळे तेथील उताराला नुकसान झाले. यानंतर रेल्वेमार्ग काही काळासाठी बंद करावा लागला. मालिबूमध्ये समुद्र किनारी एका घराच्या ड्राइक्हवेमध्ये मोठा सिंकहोल तयार झाला, यानंतर आसपासच्या 31 घरांना रिकामी करविण्यात आले आणि स्थानिक स्तरावर आणीबाणी घोषित करण्यात आली.

अल-नीनामुळे वाढणार समस्या

वैज्ञानिकांनुसार समुद्राचे तापमान सध्या सरासरीपेक्षा अधिक आहे. मजबूत अल-नीनो आल्यावर समुद्राचे तापमान आणखी वाढू शकते. यामुळे वादळांना अधिक शक्ती मिळू शकते आणि तीव्र लाटांसोबत अतिवृष्टीचा धोकाही वाढू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे क्लायमेट सायंटिस्ट डॅनियल स्वेन यांनी अलिकडेच झालेले नुकसान आगामी ऋतूची केवळ एक झलक असू शकते. चालू वर्षाच्या अखेरीस आणि खासकरून हिवाळ्यात किनारी भागांमध्ये पूरस्थिती आणखी खराब होऊ शकते. अल-नीनोमुळे दरवेळी मोठी वादळे येतील असे नाही, परंतु यामुळे दक्षिण कॅलिफोर्नियात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वाढते. समुद्राचे तापमान अधिक राहिल्यास किनाऱ्यानजीक राहणाऱ्या लोकांसाठी धोका वाढू शकतो.

प्रशासनाकडून तयारी सुरू

संभाव्य धोका पाहता स्थानिक प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लाँग बीचमध्ये शिल्लक वाळूची सुरक्षा अन् समुद्राला रोखणाऱ्या भिंतीला मजबूत केले जातेय. व्हेंचुरा काउंटीमध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता असेल्या ठिकाणांची ओळख पटविली जात आहे. ऑरेंज काउंटीमध्ये पाणी बाहेर काढणाऱ्या पंप्सना तयार केले जातेय. अनेक किनारी भागांमध्ये वाळूने भरलेल्या बॅग्ज जमा केल्या जात आहेत, जेणेकरून गरज भासल्यास पूराचे पाणी रोखण्यास मदत होऊ शकेल. अधिकाऱ्यांना केवळ समुद्राच्या लाटांची चिंता नाही. आगामी महिन्यांमध्ये जोरदार पाऊस पडल्यास पूर अन् पर्वतीय भागांमध्ये माती सरकण्याचा धोका वाढू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat