Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सर्वात धोकादायक खड्डा

सर्वात धोकादायक खड्डा

खाली डोकावल्यास दिसणार रहस्यमय जग

गात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी स्वत:ची रहस्यमय रचना आणि धोकादायक स्वरुपामुळे लोकांना थक्क करत असतात. सध्या एक असाच विशाल खड्डा चर्चेत आहे, ज्याला जगातील सर्वात धोकादायक खड्डायांपैकी एक मानण्यात येत आहे.

या खड्डयाची खोली आणि आतील दृश्य पाहून लोक हादरून जातात. यात डोकावल्यास जणू दुसऱ्या जगाची झलक दिसत असल्याचे वाटू लागते.

हा रहस्यमय खड्डायेमेनच्या अल-महरा क्षेत्रात स्थित 'वेल ऑफ भरहुत' असून ज्याला स्थानिक लोक 'नरकाचे द्वार'ही म्हणतात. याची खोली सुमारे 100 ते 250 मीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. तर रुंदी देखील अत्यंत अधिक आहे. दीर्घकाळापर्यंत या ख•dयाविषयी अनेक प्रकारच्या कहाण्या प्रचलित राहिल्या आहेत. ज्यात रहस्यमय शक्ती वास करत असल्याची कहाणी देखील सामील आहे. परंतु वैज्ञानिकांनी या दाव्यांना फेटाळत याला एक नैसर्गिक भूगर्भीय संरचना संबोधिले आहे.

तज्ञांनुसार अशाप्रकारचे खड्डा पर्वत खचणे, पाण्याचा प्रवाह आणि जमीन खचल्याने तयार होतात, ज्यांना 'सिंकहोल' म्हटले जाते. या खड्डयाच्या आतील वातावरण अत्यंत अंधकारमय आणि आर्द्रतायुक्त आहे, जेथे अजब प्रकारच्या संरचना, खड आणि कधीकधी अन्य जीवही आढळून येतात. खालून येणारा दुर्गंध आणि मर्यादित ऑक्सिजन याला आणखी धोकादायक स्वरुप प्राप्त करून देतात.

अलिकडेच एका टीमने सुरक्षा उपकरणांसोबत या ख•dयात उरत तपासणी केली असता अनेक चकित करणाऱ्या बाबी समोर आल्या. आत पाणी, गुहेसारख्या संरचना आणि जीव-जंतूंच्या अस्तित्वाच्या खुणा मिळाल्या, काही रहस्यमय गोष्टी तेथे असल्याचे लोकांचे सांगणे आहे. हे ठिकाण आजही लोकांसाठी रहस्य आणि भीतीचे केंद्र ठरले आहे.

प्रशासन आणि तज्ञ सातत्याने लोकांना सुरक्षेशिवाय अशा स्थानांनजीक जाणे जोखिमीचे असू शकते असा इशारा देत असतात. येथे किंचित चूकही दुर्घटनेचे कारण ठरू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat