Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara crime | साताऱ्यात धक्कादायक प्रकार: चाकूचा धाक दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

Satara crime | साताऱ्यात धक्कादायक प्रकार: चाकूचा धाक दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

साताऱ्यात महिलेला चाकूचा धाक

सातारा - सातारा शहर परिसरात एका जे महिलेला चाकूचा धाक दाखवत शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आर्थिक फसवणुकीचा ॥ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादा दामोदर जाधव (रा. विद्यानगर, गणेश चौक, कोडोली, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या पैशांच्या व्यवहारासंदर्भात बोलणी करण्यासाठी आरोपीने तिला आपल्या घरी बोलावून घेतले. यावेळी आरोपीने महिलेचा हात धरून चाकूचा धाक दाखवत ‘पैसे हवे असतील तर माझ्याजवळ झोप’ असे अश्लील व मानहानीकारक वक्तव्य केले. तसेच, आरोपीने फिर्यादी महिलेचा विश्वासघात करून तिच्याकडून घेतलेल्या १२ लाख रुपयांपैकी केवळ १ लाख १५ हजार रुपये परत केले असून उर्वरित १० लाख ८५ हजार रुपये परत न देता आर्थिक फसवणूककेल्याचेही समोर आले आहे.

ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरी घडली. या प्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ३ तारखेला दुपारी सुमारे १ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat