वृत्तसंस्था, सिंगापूर
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सिंगापूर खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठताना कोरियाच्या टॉपसिडेड जोडीला पराभूत केले.
पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात सात्विक आणि चिराग या जोडीने सिंगापूरच्या टॉपसिडेड जोडी किम हो आणि सीओ जेई यांचा 21-19, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. हा उपांत्य सामना 52 मिनिटे चालला होता. मात्र मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. जमानच्या शिमोगामी आणि होबारा या जोडीने ध्रुव कपिला आणि तनीषा क्रेस्टो यांचा 21-16, 17-21, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केला. पुरूष दुहेरीत कोरियाची किम हो आणि सिओ जेई ही विद्यमान विश्व चॅम्पियन जोडी आहे.

