सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या वतीने रविवारी दि. २६ जुलै कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सावंतवाडी येथील नवरंग हॉल, राणी पार्वतीदेवी हायस्कूल येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून कारगिल वीरांना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.
प्रभात फेरीचा मार्ग आर.पी.डी. हायस्कूल, बाजारपेठ, गांधी चौक, श्रीराम वाचन मंदिर, राजवाडा गार्डन, रामेश्वर प्लाझा मार्गे पुन्हा आर.पी.डी. हायस्कूल असा असणार आहे. या प्रभात फेरीत आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीरपत्नी तसेच विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“ज्यांच्या शौर्यामुळे तिरंगा सदैव दिमाखात फडकतो, त्या कारगिल वीरांना कृतज्ञ राष्ट्राचा मानाचा मुजरा अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या वतीने या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

