Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shahuwadi | शाहूवाडीजवळ भीषण अपघात: पुण्याहून गोव्याला जाणारी कार ओढ्यात कोसळली, एकाचा मृत्यू!

Shahuwadi | शाहूवाडीजवळ भीषण अपघात: पुण्याहून गोव्याला जाणारी कार ओढ्यात कोसळली, एकाचा मृत्यू!

पुणे-गोवा मार्गावर दुर्दैवी घटना

शाहूवाडी -मलकापूर येळवण जुगाई मार्गावर उचत गावच्या हद्दीत पुण्याहून गोव्याकडे निघालेली चार चाकी गाडी ओड्यात कोसळली .या अपघातात रस्त्याने जात असलेला अज्ञात वाटसरू जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली .या अपघाताची शाहूवाडी पोलीसांत नोंद झाली असून गुरुवारी पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडला .

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून चार चाकी गाडी चालक सिद्धेश मधुसूदन सालंकर वय 46 हे गोव्याकडे जात होते . याच दरम्यान उचत गावच्या हद्दीत अज्ञात वाटसरू रस्त्याने जात होता सदर चार चाकी रस्ता लागत असलेल्या ओढ्यात कोसळली .

यामध्ये अज्ञात इसम हे गंभीर जखमी होऊन जाग्यावरच गत प्राण झाले .घटनास्थळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस ए एस पावरा यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली तर उचतचे पोलीस पाटील संदीप बोरगे यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat