Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shahuwadi | शाहूवाडीत खरिपाच्या ऐन हंगामात डिझेल-पेट्रोलचा तुटवडा; पंपांवर लागल्या वाहनांच्या रांगा!

Shahuwadi | शाहूवाडीत खरिपाच्या ऐन हंगामात डिझेल-पेट्रोलचा तुटवडा; पंपांवर लागल्या वाहनांच्या रांगा!

डिझेल-पेट्रोल दरवाढीने ग्रामीण भागातील शेतकरी संकटात

शाहूवाडी ( संतोष कुंभार) - खरीप हंगामाची लगबग जोरात सुरू झालेली आहे . शेती कामासाठी शेतकऱ्यांच्यात धावपळ दिसत आहे .मात्र डिझेल पेट्रोलचे दर वाढले आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सह सर्वसामान्य जनतेसमोर चिंतेचे ढग उभा राहू लागले .

पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्या तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपले असल्याचे बोर्ड लागले आहेत .

मागील काही दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ लागली आणि याचा परिणाम ग्रामीण भागात दिसू लागला .मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर व रोटर चा वापर अधिक प्रमाणात होत आहे .याशिवाय विविध अन्य वाहनांना देखील डिझेल पेट्रोल लागत आहे . मात्र भेडसावत असलेली डिझेल पेट्रोल समस्या शेतकऱ्यांच्यात चांगलीच परिणामकारक दिसू लागली आहे . ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा लागत आहेत .रोहिणी नक्षत्र निघाले आहे त्यामुळे पेरणीची काम अंतिम टप्प्यात आली आहे . यासाठी पेट्रोल पंपावर जाण्याइतपत पण तेल नसल्याने शेतकऱ्यांना देखील चांगलीच कसरत करावी लागत आहे .

यामुळे दुचाकीवरून कॅन घेऊन डिझेल पेट्रोल साठी धावाधाव करावी लागत आहे .एकतर पावसाळ्याची लागलेली चाहूल आणि वाढते डिझेल पेट्रोलचे दर त्यातच शेतीची सुरू असलेली काम यामुळे ग्रामीण भागात चांगलीच तारेवरची कसरत डिझेल पेट्रोल साठी दिसत आहे .

एकूणच डिझेल पेट्रोलची वाढती झळ ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना चांगलीच बसत असल्याचं जाणवू लागल आहे .पेरणीच्या हंगामा मध्ये शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या यांत्रिक अवजारांना डीजेल पेट्रोलची गरज भासत आहे . मात्र वाढलेले दर आणि भेडसावत असलेली समस्या यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat