Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शांतता करारावर लवकरच निर्णय

शांतता करारावर लवकरच निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संभाव्य कराराच्या अनेक अटी उघड करतानाच लवकरच शांतता करारावर निर्णय जाहीर करणार असल्याचे शुक्रवारी सांगितले.

इराण अणुबॉम्ब विकसित करणार नाही. शिवाय, होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी पूर्णपणे खुली राहील आणि कोणताही टोल आकारला जाणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. तसेच अमेरिका आपली नौदल नाकेबंदी उठवत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सर्व सागरी सुरुंग हटवले जातील. अमेरिकेने यापूर्वीच अनेक सुरुंग नष्ट केले आहेत आणि उर्वरित सुरुंग हटवण्याची जबाबदारी इराणची असेल, असेही ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

इराणचे संवर्धित युरेनियम देखील नष्ट केले जाईल. हे युरेनियम पर्वतांखाली असून ते 11 महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सनी लक्ष्य केले होते. हे साहित्य अमेरिका, चीन, इराण आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी यांच्या मदतीने बाहेर काढून नष्ट केले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. इराणकडे 60 टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेले 440 किलो युरेनियम असल्याचा दावा केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat