Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिरोडा वेळागर येथे जखमी 'ऑलिव्ह रिडले'ला जीवदान

शिरोडा वेळागर येथे जखमी 'ऑलिव्ह रिडले'ला जीवदान

वेंगुर्ले/ प्रतिनिधी : शिरोडा वेळागर येथे आढळून आलेल्या जखमी अवस्थेतील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाला सुरक्षितरित्या पकडून कांदळवण विभाग मालवणच्या ताब्यात देण्यात आले. सदर कसवावर उपचार करून पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर नैसगिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी उशिरा शिरोडा – वेळागर येथील समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेतील हे कासव स्थानिकांना आठळून आले होते. होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष मातोंडकर, होमगार्ड राजेंद्र पालकर , जीवरक्षक संजय नार्वेकर, समीर भगत, संतोष भगत, आबा चिपकर, उत्तम आरोलकर यांनी या कासवला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यानंतर मालवण कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ किनाऱ्यावर घेत या कासवाला ताब्यात घेतले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat