Dailyhunt
श्री महालक्ष्मी प्रसन्न मुचंडी 'बेळगाव हिंदकेसरी'

श्री महालक्ष्मी प्रसन्न मुचंडी 'बेळगाव हिंदकेसरी'

श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग बैलगाडा शर्यत : श्री भावकेश्वरी प्रसन्न मुतगा ठरला लहान गटाचा मानकरी

बेळगाव : अनगोळ येथे श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत मोठ्या गटात श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न-मुचंडी ही बैलजोडी बेळगाव हिंदकेसरी किताबची मानकरी ठरली.

या जोडीला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रूपयांचे तर श्री भावकेश्वरी प्रसन्न-मुतगा या बैलजोडीने लहान गटात बेळगाव हिंदकेसरी किताब आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस पटकाविले.

 अनगोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, सामाजिक कार्यकर्ते उमेश कुऱ्याळकर,जोतिबा लाटुकर,जोतिबा यळ्ळूरकर, रवी यळ्ळूरकर, महेश गौंडाडकर, बाळु कुऱ्याळकर, सुभाष चिंचणेकर,अनिल लाटुकर, संजय लाटुकर, प्रकाश जाधव,बळीराम जाधव, शिवाजी देसाई तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा देणगीदारांचा तसेच शर्यतीत सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा फेटा बांधुन शाल, सन्मानचिन्ह देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 मोठा गट अंतिम निकाल -

1)श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न मुचंडी 34.47 सेकंद 2) ब्रम्हलिंग प्रसन्न सुळगा, हिंडलगा 34.55,सेकंद 3) संगम मल्लिकार्जुन प्रसन्न भेंडीगेरी 34.58 सेकंद 4) लक्ष्मी प्रसन्न कुंदर्गी मंचापुर 34.62, 5) कलमेश्वर प्रसन्न अनगोळ 34.70, 6) कलमेश्वर प्रसन्न अनगोळ 34.72, 7) चव्हाटा प्रसन्न वाघवडे 34.87, 8) श्री देवी सातेरी पावशी सिंधुदुर्ग 34.88, 9) खंडेश्वर प्रसन्न वाघवाडी सातारा 34.98, 10) नागनाथ प्रसन्न बेक्कीनकेरी 34.99, 11) ग्रामदेवी प्रसन्न चिंचनुर किटदाळ 34.99, 12) भावकेश्वरी प्रसन्न मुतगा 35.00, 13) रामलिंग प्रसन्न तडशीनहाळ 35.19, 14) गुडद्मादेवी प्रसन्न मारीहाळ केदनुर 35.21, 15) ज्योतिर्लिंग प्रसन्न तुर्केवाडी 35.37, 16) जय हनुमान खंडोबा प्रसन्न वाघराळी कोवाड 35.55, 17) बसवेश्वर प्रसन्न जोडगोळी डुमगोळ 35.63, 18) बसवेश्वर प्रसन्न बसरीकट्टी 35.70, 19) भावकेश्वरी प्रसन्न कुप्पटगीरी 35.78, 20) वेताळ प्रसन्न तुर्केवाडी 35.78, 21) उत्तम फौजी व श्रीधर मोरे शिरोली सांवगाव 35.89, 22) सातेरी देवी प्रसन्न सोनारवाडी एमएटी 35.91, 23) नागनाथ प्रसन्न बेक्कीनकेरी 35.93, 24) हिंदकेसरी वीरा तेऊरवाडी कोवाड 35.95, 25) उमेश कुऱ्याळकर अनगोळ 35.99, 26)कलमेश्वर प्रसन्न सांवगाव 36.01,27) काळभैरव प्रसन्न मारिहाळ 36.02, 28) चव्हाटा प्रसन्न वाघवडे सांवगाव 36.08 29) नागनाथ प्रसन्न बेक्कीनकेरी निडगल 36.25 सेकंद 30) चंदगड एक्स्प्रेस आझाद नगर चंदगड 36.72 सेकंद. भाग्यशाली 51 क्रमांक विजेता श्री सिद्धेश्वर प्रसन्न कुदनुर 37.78 सेकंद

 लहान गट अंतिम निकाल

1)श्री भावेश्वरी प्रसन्न मुतगा 32.17 सेकंद 2) श्री दुर्गा देवी प्रसन्न सांबरा 33.72 सेकंद 3) श्री बसवेश्वर प्रसन्न गंदीगवाड हुलंबी 33.06 सेकंद 4) श्री करियम्मादेवी प्रसन्न सुळेभावी 34.13,5) उळवी चन्नबसवेश्वर प्रसन्न हुबळी 35.06, 6)श्री ग्रामदेदेवी प्रसन्न हलगीमर्डी मीश्रीगुडी 35.12, 7)श्री महालक्ष्मी प्रसन्न बागेवाडी 35.30,8)श्री बाळूमामा प्रसन्न किटवाड मोदेकोप 35.57,9)श्री.ग्रामदेवी प्रसन्न बैलहोंगल 35.64, 10) श्री ग्रामदेवी प्रसन्न तुमरीकोप 35.71, 11) श्री ग्रामदेवी प्रसन्न लखमापूर 36.06, 12) श्रीराम लक्ष्मण सिद्धेश्वर प्रसन्न राजहंस गड कुमरीकोप 36.17, 13) श्री कालिका देवी प्रसन्न हुबळी 36.38, 14) श्री व्हळेम्देवी प्रसन्न मुत्यानट्टी 36.76, 15) श्री संगमेश्वर प्रसन्न दडवाड मलीकवाड 36.96, 16) श्री कोरजाई प्रसन्न सावगाव 37.22, 17) श्री जय हनुमान प्रसन्न कणबर्गी अर्जुनवाडकर 37.29, 18) नाथप्रेमी नार्वेकर गल्ली बेळगाव 37.46, 19)श्री बसवेश्वर प्रसन्न राजगोळी 38.50, 20)श्री देर देवर प्रसन्न कुडची 38.82, 21) श्री कलमेश्वर प्रसन्न कालकुंद्रीकर 38.95,22) कलमेश्वर बसवेश्वर प्रसन्न बसवण कुडची 39.03 सेकंद 23)श्री मडिवाळेश्वर प्रसन्न बडस 39.19,24)श्री ब्रह्मलिंग प्रसन्न धामणे 39.38 सेकंद 25)श्री कलमेश्वर प्रसन्न मोरब मुचंडी 39. 49 सेकंद. उत्कृष्ट बैलगाडा चालक लहान गट-कऱ्यापा हिडकल, सौदागर सुतार,कुदनुर व्यंकापा,उत्कृष्ट बैलगाडा चालक,मोठा गट-लक्काप्पा शिगेळ्ळी,बोराप्पा पाटिल रामा अंकलगी या गाडी चालकांना रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेचे समालोचन भारत कांबळे व भावेश बिर्जे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार युवराज पाटील,उमेश कुऱ्याळकर यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat