Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंगापूर ओपनमध्ये प्रणॉयचा जोनातन ख्रिस्टीला धक्का

सिंगापूर ओपनमध्ये प्रणॉयचा जोनातन ख्रिस्टीला धक्का

सात्विक-चिराग, सिंधू दुसऱ्या फेरीत, आयुष शेट्टी, श्रीकांत, मालविका बनसोड पराभूत

वृत्तसंस्था, सिंगापूर

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने बुधवारी सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

त्याने इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकीत जोनातन ख्रिस्टीवर तीन गेममध्ये शानदार विजय मिळविला.

2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता असलेला हा 33 वर्षीय भारतीय खेळाडू, जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियन प्रतिस्पर्ध्यांवर एका तासाहून थोड्या अधिक कालावधीत 10-21, 21-12, 21-18 अशा गुणांनी मात केली. ख्रिस्टीवर मिळवलेला हा त्याचा पाच वर्षातील पहिलाच विजय होता. यापूर्वी त्याने 2021 च्या इंडोनेशिया ओपनमध्ये ख्रिस्टीचा पराभव केला होता.

श्रीकांत आणि बनसोड स्पर्धेतून बाहेर

माजी जागतिक अव्वल खेळाडू आणि 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता असलेल्या श्रीकांतने निकराचा लढा दिला. परंतु अखेरीस त्याला स्थानिक हिरो लहोह कीन यु कडून 20-22, 21-1। 17-21 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागला. लोह कीन यने गेल्या आठवड्यात या भारतीय खेळाडूकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

एसीएल दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमनच्या वाटेवर असलेल्या मालविकालाही शर्थीचे प्रयत्न करुनही स्पर्धेत पुढे जाता आले नाही. तिला चीन तैपेईच्या लिन शियांग टी कडून 21-11, 19-21, 12-21 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.

सिंधू, सात्विक-चिराग दुसऱ्या फेरीत

महिला एकेरीच्या सामन्यात, पाचवी मानांकित खेळाडू पुत्री कुसुमा वारदानीचा सरळ सेट्समध्ये पराभव करत पी. व्ही. सिंधूने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 30 वर्षीय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने 10,00,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस असलेल्या या सुपर 750 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या खेळाडूचा 21-17, 21-18 अशा गुणांनी पराभव केला. माजी विश्वविजेती सिंधूचा पुढील सामना जपानच्या रिको गुंजीशी होईल.

पुरूष दुहेरीमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते सात्विक साईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनीही पहिल्या फेरीत मलेशियाच्या चेन झी यी आणि प्रेस्ली स्मिथ यांचा 26-28, 21-15, 21-13 अशा गुणांनी पराभव करत पुढील फेरीत मजल मारली. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय जोडीचा पुढील सामना चीन तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो हसुआन यांच्याशी किंवा चीनच्या लिय यांग आणि हुआंग दी यांच्याशी होईल. मात्र पुरूष एकेरीच्या 65 मिनिटे चालेल्या सामन्यात विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून 21-11, 14-21, 12-21 अशा गुणांनी पराभव झाल्यामुळे आयुष शेट्टीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

भारताची युवा खेळाडू उन्नती हुडा हिलाही पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या सामन्यात माजी विश्व कनिष्ठ विजेती आणि आठवी मानांकीत खेळाडू टोमोका मियाझाकीने तिचा 14-21, 10-21 अशा गुणांनी पराभव केला. महिला दुहेरीमध्ये भारताच्या कविप्रिया सेल्वम आणि सिमरन सिंघी या जोडीला 48 मिनिटे चालेल्या सामन्यात, स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लुसिया रॉड्रिग्ज यांच्याकडून 21-18, 13-21, 5-21 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या आणखी एका जोडीला अश्विनी भट के. आणि शिखा गौतम यांना चीन तैपेईच्या चांग चिंग हुई आणि यांग चिंग टुन यांच्याकडून 16-21, 11-21 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. पुरूष दुहेरीच्या आणखी एका सामन्यात जपानची सातवी मानांकीत जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांनी भारताच्या हरिहरन अमसकरुनन आणि एम. आर. अर्जुन यांचा 21-15, 21-13 अशा गुणांनी पराभव केला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी ग•s या जोडीला पहिल्याच फेरीत चीन तैपेईच्या यांग पो हान आणि हू लिंग फँग यांच्याकडून 18-21, 20-22 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat