Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Solapur News | अंत्रोळीत बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज

Solapur News | अंत्रोळीत बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज

सोलापुरात बकरी ईदनिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त

सोलापूर : गुरुवार 28 मे रोजी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बंदोबस्तासाठी ३ पोलीस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१ पोलीस निरीक्षक, ४० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच ६४० पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय २२० होमगार्ड जवानांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बाहेरील बंदोबस्तासाठी १ एसआरपीएफ कंपनी, ३५० पुरुष गृहसंरक्षक आणि २०० महिला गृहसंरक्षक यांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बकरी ईद सण शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat