Dailyhunt
Solapur News | कचरा डेपो पुन्हा धगधगला! सोलापूर-तुळजापूर रोडवर आगीचे तांडव, अग्निशमन दलाची झुंज

Solapur News | कचरा डेपो पुन्हा धगधगला! सोलापूर-तुळजापूर रोडवर आगीचे तांडव, अग्निशमन दलाची झुंज

सोलापूर कचरा डेपोला भर दुपारी आग

सोलापूर - सोलापूर तुळजापूर रोडवर असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोला भर दुपारीच आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे.

दरम्यान गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीही अशीच येथील कचरा डेपोला आग लागली होती.

त्यावेळी कचरा डेपोला लागलेली आग सुमारे महिनाभर धुमसत होती. आताही येथीलच कचरा डेपोला आग लागली असून धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आग लवकर आटोक्यात येणे जिकरीचे बनले आहे. आग लवकर नियंत्रणात आली नाही तर यातून निर्माण होणारा धूर व काजळी शहरात पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat