Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' यशस्वी

'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' यशस्वी

टॉम हॉलंड मुख्य भूमिकेत

गभरातील प्रेक्षक सध्या स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे या चित्रपटाचा आनंद घेत आहेत. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजेच एमसीयूच्या या प्रोजेक्टवरून प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे.

यात पीटर पार्कर म्हणजेच स्पायडर मॅनच्या पर्सनल जर्नीची इमोशनल कहाणी तसेच अॅक्शन अॅडव्हेंचरही दाखविण्यात आली आहे.

टॉम हॉलंडची मुख्य भूमिका असलेल्या सुपरहिरो चित्रपटावरून निर्मात्यांनी मोठी तयारी केली होती. याच्या ट्रेलरमध्ये पीटर पार्क स्वत:चा गमावलेला मित्र, हरवलेले प्रेम आणि नव्या ओळखीवरून अत्यंत भावुक असल्याचे अन् त्याचे लोकच त्याला ओळखू शकत नसल्याचे दाखविण्यात आले होते. तर ट्रेलरच्या उत्तरार्धात स्पायडर मॅन स्वत:च्या नव्या शत्रूसोबत संघर्ष करताना दिसून येतो.

याचबरोबर हल्कसोबत त्याची लढाई दाखविण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये सर्वाधिक लक्ष पीटर पार्क आणि त्याची गर्लफ्रेंड एमजेमधील केमिस्ट्री वेधून घेते. प्रेयसीची भूमिका झेंडायाने साकारली आहे. झेंडाया ही खऱ्या आयुष्यात टॉम हॉलंडची प्रेयसी आहे. हा चित्रपट जगभरात 31 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat