बेळगाव :
स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांचा 25 व 26 मे रोजी होणारा देशव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी कोणत्याही प्रकारची निदर्शने होणार नसून, बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत.
आपल्या विविध मागण्यांसाठी स्टेट बँकेचे कर्मचारी दोन दिवसीय संपावर जाणार होते. यासाठी बेळगावच्या गोवावेस येथे जागृती फेरी काढण्यात आली होती. शुक्रवारी रात्री सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

