Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tourist Stuck on fort दाट धुके, निसरडे रस्ते अन् पाऊस.तांदूळवाडी किल्ल्यावर अडकले ६ पर्यटक, अशी झाली सुटका

Tourist Stuck on fort दाट धुके, निसरडे रस्ते अन् पाऊस.तांदूळवाडी किल्ल्यावर अडकले ६ पर्यटक, अशी झाली सुटका

हाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तांदूळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले ६ जण अडकले होते. दाट धुके, निसरडे रस्ते आणि पावसामुळे त्यांना किल्ल्यावरुन खाली येण्यात अडचण येत होती. अखेर बचाव पथकाने त्वरेने संबंधित ६ जणांची सुखरूप सुटका केली आहे.

सविस्तर वृत्त असे

नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आल्हाददायक हवामानातच, पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ल्यावर सहा पर्यटक दाट धुक्यात अडकल्य़ाची माहिती पोलीसांना मिळाली. खराब हवामान, दाट धुके आणि निसरड्या रस्त्यांचा सामना करत बचाव पथकांनी सर्व सहा पर्यटकांना शोधून काढले आणि त्यांना सुखरूप खाली आणले.

सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सफळे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवले. हे पर्यटक पालघरच्या दांडेकर कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाट धुक्यात अडकल्यानंतर या पर्यटकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्वरेने त्यांची सुटका करण्याची मोहीम हाती घेतली.

११२ क्रमांकाचा वापर

पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी या गटाने ११२ या आपत्कालीन हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर सफळे पोलीस ठाण्याच्या पथकाने बचावकार्य सुरू केले. देशमुख यांनी सांगितले की, ३ जुलै रोजी नालासोपारा, विरार आणि डहाणू येथील सहा पर्यटकांचा (चार पुरुष आणि दोन महिला) एक गट तांदुळवाडी किल्ल्याच्या सहलीला गेला होता.

किल्ल्यावरून खाली उतरताना मुसळधार पाऊस, दाट धुके आणि निसरड्या रस्त्यांमुळे ते रस्ता चुकले आणि एका घनदाट जंगलात अडकले. ‘डायल ११२’ प्रणालीद्वारे मदतीसाठी कॉल आल्यानंतर सफळे पोलीस ठाण्यातून एक पथक तांदुळवाडी येथे पाठवण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat