Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ओटवणेत मध्यरात्री साजरा

विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ओटवणेत मध्यरात्री साजरा

टवणेवासियांच्या शुभेच्छांच्या वर्षावाने विक्रांत सावंत भारावले!

ओटवणे : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माजगाव मतदार संघाचे सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस बुधवारी मध्यरात्री ओटवणे गावात कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

ओटवणे गावातील राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड लोकप्रियता असलेले आपल्या दिलदार स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या विक्रांत सावंत यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.वाढदिवसाच्या या अभूतपूर्व स्वागताने विक्रांत सावंत भारावून गेले होते. यावेळी बोलताना त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ​ओटवणे गावाने दिलेले हे प्रेम अनमोल असून ते जनतेची सेवा करण्यासाठी अधिक ऊर्जा देते. त्यामुळे ओटवणे गावासह आणि संपूर्ण माजगाव मतदार संघाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही दिली.​ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, शिवसेनेचे माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर, नाट्यकर्मी रामदास पारकर, माजगाव माजी उपसरपंच संतोष वेजरे, सामाजिक कार्यकर्ते गुंडू जाधव, भाजपा बुथ अध्यक्ष विश्वनाथ बोर्ये, संतोष सावंत, लुमा जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपीडी हायस्कूलचे शिक्षक दशरथ शृंगारे यांनी केले.

ऑर्केस्ट्रा जल्लोष’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

यावेळी सिंधू कलाकार मंच प्रस्तुत ‘ऑर्केस्ट्रा जल्लोष’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आनंद साळगावकर, हेमंत गवस, शेखर सावंत, रामदास पारकर यांनी मुकेश, किशोर, रफि, सुरेश वाडकर, कुमार सानू, सोनू निगम या ख्यातनाम गायकांची एकापेक्षा एक अशी सरस मराठी व हिंदी गाणी सादर करीत रसिकांना अभ्यास बेहद्द खुश केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन रामदास पारकर यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat