Dailyhunt
विनापरवाना डीजे लावणाऱ्या तिघांविरुद्ध मारिहाळ पोलिसात एफआयआर

विनापरवाना डीजे लावणाऱ्या तिघांविरुद्ध मारिहाळ पोलिसात एफआयआर

सुळेभावीमध्ये लग्न समारंभात वाजविला डीजे

बेळगाव : कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लग्न समारंभासाठी डीजे लावणाऱ्या तिघा जणांविरुद्ध मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साऊंड सिस्टीमही जप्त केली आहे.

शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी रात्री मारिहाळ पोलीस स्थानकातील आय. एम. शिलवंतर यांनी फिर्याद दिली आहे.

सुरेश रामाप्पा बंगन्नावर, राहणार सुळेभावी, वीरभद्र नागाप्पा यरगुद्दी, राहणार सोमनट्टी, रोहित देवाप्पा लक्कनगौडर, राहणार सुळेभावी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. होसकेरी गल्ली, सुळेभावी येथे एका लग्न समारंभानिमित्त मध्यरात्री कोणतीही पूर्वपरवानगी न घेता डीजे लावण्यात आला होता. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होईल अशा पद्धतीने कर्कश आवाजात गाणी वाजविण्यात येत होती. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे उपद्रव होत असल्याचे लक्षात येताच सरकारतर्फे फिर्याद दाखल करून साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat