Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विषाची 'चोरी' करणारा साप

विषाची 'चोरी' करणारा साप

नेक सर्प विषारी असतात हे सर्वांना ज्ञात आहे. अशा सर्पाने दंश केल्यास माणूस किंवा प्राण्यावर तत्काळ उपचार करावे लागतात. हे विष सर्पाच्या शरीरातच निर्माण होते आणि ते त्याच्या दातांच्या आतल्या भागात साठून राहते.

सर्पाने दंश केल्यानंतर ते ज्याला दंश झाला आहे, त्याच्या रक्तात प्रवेश करते, ही माहिती आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आहे. तथापि, या पृथ्वीवर एक सर्प प्रजाती अशीही आहे, की या प्रकारचे सर्प स्वत:चे विष स्वत:च्या शरीरात निर्माण करु शकत नाहीत. हे विष त्यांना, त्यांचे भक्ष्य असणाऱ्या बेडकांकडून चोरावे लागते.

या अद्भूत सर्पाचे नाव 'रेड नेक्ड कीलबॅक' असे आहे. विषारी बेडूक आणि टोळ हे त्याचे नैसर्गिक भक्ष्य आहे. हा सर्प विषारीच आहे. याचा अर्थ असा की, विष हेच याचे संरक्षणाचे साधन आहे. पण हे विष त्याच्या स्वत:च्या शरीरात निर्माण होतच नाही. ज्याप्रमाणे कोकिळा कावळीच्या घरट्यात अंडी घालते, (कारण तिला स्वत:चे घरटे बांधता येत नाही) त्याप्रमाणे हा सर्पही स्वत:च्या संरक्षणासाठीचे विष अन्य प्राण्यांच्या शरीरातून मिळवत असतो. जेव्हा हा सर्प आपले विषारी बेडूक किंवा टोळ आदी भक्ष्य गिळतो, तेव्हा त्या भक्ष्याच्या शरीरातील विष शोषून घेऊन ते आपल्या मानेत असणाऱ्या 'न्यूचल ग्लँडस्' नामक विशेष गंथींमध्ये साठवून ठेवतो. या विषारी बेडकांच्या किंवा टोळांच्या रक्तात 'ब्युफाडिएनोलाईड्स्' नामक विषारी रासायनिक पदार्थ असतात. ते हा सर्प आपल्या ग्रंथींमध्ये साठवतो आणि भक्ष्याचा उरलेला भाग पचवतो. हाच विषारी पदार्थ आवश्यकतेनुसार या सर्पाचे संरक्षण करतो. अन्य विषारी प्राण्याचे विष अशा प्रकारे चोरुन आपल्या संरक्षणासाठी उपयोगात आणणारा हा सर्प पृथ्वीवरील एकमेव आहे, असे मानले जाते. या सर्पावर आणखी संशोधन करण्यात येत असून त्याची अन्य वैशिष्ट्योही संशोधकांकडून समजून घेतली जात आहे, अशी माहिती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat