Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१०२ रुग्णवाहिकासाठी आता 'कॅशलेस पेट्रोकार्ड' ही नाविन्यपूर्ण सुविधा

१०२ रुग्णवाहिकासाठी आता 'कॅशलेस पेट्रोकार्ड' ही नाविन्यपूर्ण सुविधा

मुंबई : (Cashless Petrocard) राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासनाने कॅशलेस 'पेट्रोकार्ड' या सुविधेचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू आहे. यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात 'कॅशलेस पेट्रोकार्ड'उपक्रमाचे उदघाटन गुरुवार दि.३० रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येऊन कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल. आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक बनून संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनणार आहे. महत्वाचे म्हणजे यापूर्वी १०२ रुग्णवाहिकेची सेवा ही माता व बालकांसाठी वापरात होती. यापुढे १०२ रुग्णवाहिका सर्व रुग्णासाठी उपलब्ध करून देण्यात येत असुन, ही सेवाअधिक प्रभावी, सक्षम करुन १०८ रुग्णवाहिकेला पर्यायी व्यवस्था तयार करावी अशी सुचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली.(Cashless Petrocard)

राज्यातील शासकीय वाहनाना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा 'कॅशलेस पेट्रोकार्ड' हा अभिनव उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील ३१९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएल कंपनीचे 'कॅशलेस पेट्रोकार्ड देण्यात येणार आहे.(Cashless Petrocard)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai