मुंबई: (Arjun Tendulkar) क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या आयपीएलमुळे चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सचा निरोप घेत अर्जुनने लखनौ सुपर जायंट्स संघात प्रवेश केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
(Arjun Tendulkar)
एका पॉडकास्टमध्ये बोलताना अर्जुनने आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, 'कोणालाही बेंचवर बसायला आवडत नाही. पण मेहनत करत राहणं महत्त्वाचं आहे. संधी मिळाली की त्याचा फायदा करून घ्यायला हवा.' (Arjun Tendulkar)
अर्जुन २०२१ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र २०२१ ते २०२५ या कालावधीत त्याला फक्त ५ सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याने ३ विकेट्स घेतल्या. स्विंग गोलंदाजीची क्षमता असूनही पुरेशी संधी मिळाली नाही, अशी चर्चा होती. त्यामुळेच आयपीएल २०२६ आधी लखनौ सुपर जायंट्सने त्याला ३० लाख रुपयांना ट्रेड केलं. आता नव्या संघात स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याला मिळणार आहे. (Arjun Tendulkar)
वडिलांशी तुलना; अर्जुनचं स्पष्ट मत
सचिन तेंडुलकर यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत अर्जुनने स्पष्टपणे सांगितले, 'मोठं नाव हा आशीर्वाद आहे, पण त्यासोबत आव्हानंही येतात. मी क्रिकेट कोणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही, तर पॅशन म्हणून खेळतो.' (Arjun Tendulkar)
आयपीएल कारकिर्दीचा आढावा... (Arjun Tendulkar)
२०२१ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये समावेश
२०२३ मध्ये आयपीएल पदार्पण
एकूण ५ सामने, ३ विकेट्स आणि १३ धावा
२०२६ साठी लखनौ सुपर जायंट्सकडून नवी संधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai