Dailyhunt
Ashok Kharat case: ५ मिनिटांत कोर्टाचा निर्णय! भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...

Ashok Kharat case: ५ मिनिटांत कोर्टाचा निर्णय! भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...

नाशिक: (Ashok Kharat case) नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे. बुधवार, १ एप्रिल रोजी खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर निर्णय देत खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Ashok Kharat case)

५ मिनिटांत न्यायालयाचा निर्णय....

न्यायाधीश श्रीमती बी. इन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला पुन्हा न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकील शैलेंद्र बागडे उपस्थित होते, तर तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी कागदपत्रे सादर केली. न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत निर्णय देत खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, या सुनावणीत कोणताही सविस्तर युक्तिवाद झाला नाही. उद्या पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Ashok Kharat case)

सध्या विशेष तपास पथक (SIT) कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, खरातविरोधात नव्या तक्रारीही दाखल होत आहेत. लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे प्रकारही उघड होत आहेत. (Ashok Kharat case)

हेही वाचा: Ashok Kharat case: खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! कोट्यवधींच्या संपत्तीचा पर्दाफाश, मुलगा हर्षवर्धन ताब्यात, पत्नी कल्पना खरात...

दरम्यान, एसआयटीने मंगळवार दि. ३१ मार्च रोजी पुण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंट (CA), श्री ईशान्येश्वर मंदिर येथील पुजारी आणि एका सराफा व्यावसायिकाला समोरासमोर बसवून सुमारे सहा तास चौकशी केली. या चौकशीत खडे, रत्न आणि सोन्याच्या व्यवहारात बनवाबनवी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, पुण्यातील एका बँकेच्या कर्जप्रकरणात सुमारे एक कोटी रुपयांच्या लाचेचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. (Ashok Kharat case)

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरातविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. १८ मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. (Ashok Kharat case)

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून सादर करत होता. त्याच्या मते, २२ वर्षांच्या सेवेत त्याने १५० हून अधिक देशांचा प्रवास केला होता. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि संस्कृतींचा अभ्यास केल्याचा दावा तो करत होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचेही समोर आले आहे. (Ashok Kharat case)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai