नाशिक : (Ashok Kharat case) नाशिकमधील भोंदू खरात प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले असून, त्यातून अनेक काळे कारनामे बाहेर येत आहेत. आतापर्यंत खरात विरोधात महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच काही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
यातच आता सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने सोलापूरमधील कार्यक्रमादरम्यान या प्रकरणावर कडक प्रतिक्रिया देत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Ashok Kharat case)
गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?
सोलापूरच्या खंडोबाची वाडी येथील नृत्य कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना म्हटले की, "अशा भोंदूगिरीवर योग्य आणि कडक कारवाई व्हावी, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडू नयेत." यासोबतच, तिने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. (Ashok Kharat case)
हेही वाचा: Devendra Fadnavis on Kharat case: 'कोणालाही सोडणार नाही!' मुख्यमंत्र्यांचा इशारा; भोंदू खरात प्रकरणात ईडीची एंट्री?
आता ईडी चौकशी करणार?
आतापर्यंत या सर्व प्रकरणाचा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी करत होती. त्यांच्या चौकशीत खरातची १० तास कसून चौकशी करण्यात आली. त्याशिवाय त्याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाची पिडीत महिलांसह तपासणी देखील करण्यात आली. दरम्यान, पोलीसांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करून आणखी पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढत गेली. (Ashok Kharat case)
दरम्यान, आता या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फतही चौकशी सुरू झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास ईडीकडून केला जाणार आहे. या प्रकरणात कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लीक झाल्याचा मुद्दाही समोर आला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, 'CDR मिळवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांना आहे. तो लीक कसा झाला, याची स्वतंत्र चौकशी केली जाईल.' (Ashok Kharat case)
सरकारकडून अशोक खरातची संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि महिलांवरील अत्याचाराच्या सर्व प्रकरणांचा खोलात जाऊन तपास केला जात आहे. 'त्याला कडक शिक्षा मिळेल, यावर महाराष्ट्रातील सर्वांचे एकमत आहे,' असेही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत फडणवीस म्हणाले, 'आम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले काम करत आहोत.' (Ashok Kharat case)

