नाशिक : (Ashok Kharat case) भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असताना आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची बाब उघड झाली आहे.
(Ashok Kharat case)
माहितीनुसार, या दोघींपैकी एक डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. आवडती पोस्टिंग मिळवण्यासाठी त्यांनी खरातशी संपर्क साधला होता का? तसेच त्यांच्या आणि खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते का? याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींची चौकशी विशेष तपास पथक (SIT) करत आहे. या आधी एका आयएएस अधिकाऱ्याचे नाव समोर आल्यानंतर आता पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संदर्भ समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. (Ashok Kharat case)
दरम्यान, चौकशीत खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या पद्धतींना त्याने 'विज्ञान' असे नाव दिल्याचेही उघड झाले आहे. मात्र प्रत्यक्षात कोणताही चमत्कार किंवा वशीकरण नसून, धमकावणे आणि हातचलाखीच्या माध्यमातून शोषण केल्याचे त्याने मान्य केल्याची माहिती समोर येत आहे. (Ashok Kharat case)
'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए' असे म्हणत भोंदूगिरी करणाऱ्या खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांबाबत SIT समोर माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला इतर कोणाची साथ होती का, याचाही तपास सुरू आहे. (Ashok Kharat case)
तसेच खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात पुन्हा SITच्या संपर्कात आला असून, मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी त्याची आणि त्याच्या बहिणीची चौकशी होणार आहे. आज खरातच्या पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असून उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या नव्या खुलाशांमुळे अशोक खरात प्रकरणात आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat case)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai