Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताच्या सागरी क्षेत्राला आर्थिक बळ!

भारताच्या सागरी क्षेत्राला आर्थिक बळ!

मुंबई, : (Sagarmala Finance Corporation loan disbursement)भारताच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला आर्थिक बळ देण्यासाठी सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एसएमएफसीएल) महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.

देशातील सागरी क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या या पहिल्या समर्पित बिगर-बँकिंग वित्तीय संस्थेने (NBFC) 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 5,107 कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे. आर्थिक वर्ष 2030-31 अखेरपर्यंत एकूण कर्जवितरण 60,205 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

संस्थेने आतापर्यंत 11,563 कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्याला मंजुरी दिली असून, मंजूर निधीपैकी उर्वरित रक्कम संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीनुसार वितरित केली जाणार आहे. दीर्घकालीन वित्तपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार आणि कर्ज-भागभांडवल गुणोत्तराच्या अटींनुसार अतिरिक्त भागभांडवलाची आवश्यकता भासणार आहे.(Sagarmala Finance Corporation loan disbursement)

केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (ISID) येथे एसएमएफसीएलच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सागरी क्षेत्रातील दीर्घकालीन वित्तपुरवठ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. एसएमएफसीएलमार्फत बंदरे, अंतर्गत जलमार्ग, किनारी पायाभूत सुविधा, जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि बंदरांना रस्ते व रेल्वेने जोडणाऱ्या वाहतूक प्रकल्पांना वित्तपुरवठा केला जातो.

दरम्यान, सरकारच्या मेरीटाइम डेव्हलपमेंट फंडअंतर्गत (एमडीएफ) मेरीटाइम इन्व्हेस्टमेंट फंडचे व्यवस्थापन करण्यासाठी एसबीआय व्हेंचर्स लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. या फंडाची सेबीकडे पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणून नोंदणी नोव्हेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी 2027 पर्यंत 5,000 कोटी रुपयांचा पहिला निधी टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या फंडासाठी केंद्र सरकारचे 9,800 कोटी रुपयांपर्यंतचे योगदान SMFCL मार्फत दिले जाणार आहे.(Sagarmala Finance Corporation loan disbursement)

एमडीएफच्या व्याज प्रोत्साहन निधीअंतर्गत (IIF) आतापर्यंत 4,500 कोटी रुपयांच्या कर्जांना सहाय्य मिळाले असून, कर्जदारांनी भरलेल्या व्याजापोटी सुमारे 25 कोटी रुपयांचे व्याज अनुदान वितरित करण्यात आले आहे. सोनोवाल यांनी एसएमएफसीएलही संस्था भारताच्या 'मेरीटाइम अमृत काळ व्हिजन 2047' अंतर्गत बंदरकेंद्रित विकास, जहाजबांधणी आणि किनारी संपर्कव्यवस्था मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai