Friday, 05 May, 1.01 am तरुण भारत मुंबई

महाराष्ट्र
'भिलार व्हावे प्रकाशनांचे डेस्टिनेशन' - मुख्यमंत्री

  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावांचे लोकार्पण


मराठी भाषेत लघु ब्लॉग्स हे अभिव्यक्तीला बंदिस्त करीत आहेत मात्र भिलार हे प्रकाशनातले डेस्टिनेशन प्लेस व्हावे अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुस्तकांच्या गावांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते.


समाजातले बदल साहित्यातून प्रतिबिंबित होत असतात. वाचनाकडे ओढा कमी होतो असे बोलले जाते. वेगवेगळ्या राज्यक्रांतीत पुस्तकांनी मोठी भूमिका निभावली आहे. हे साहित्यिकांचे धन शब्दातून समाजात झिरपते असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. ज्ञान मिळवण्याची पद्धती आपण बदलली तरी ज्ञानपिपासून वृत्ती कधीही बदलू शकत नाही. आपण डॉक्युमेंटेशनमध्ये मागे आहोत, आता डिजीटल माध्यमातून आपण सर्वांनी डॉक्युमेंटेशन करणे हे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.


त्याचबरोबर सजग, समर्थ संवेदनशील समाजाची पायाभरणी करणारा हा समाजोभिमुख प्रकल्प आहे. युनेस्को बुक कॅपिटल हा दरवर्षी दिला जाणारा सन्मान भिलारला मिळाला पाहीजे असे विनोद तावडे यांनी याप्रसंगी म्हटले.


वाचन संस्कृती गावोगावी रूजावी यासाठी महाराष्ट्रातील भिलार या गावात पुस्तकांचे गाव वसवले आहे. हे देशातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. आज सकाळी या ग्रंथदींडी कार्यक्रमाला सुरूवात झाली. भिलार एसटी स्टॅंडपासून २५ ठिकाणी ही दींडी फिरवून पुन्हा मुख्य ठिकाणी आणण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या ग्रंथदींडीचे लोकार्पणही करण्यात आले. मराठी भाषा विभागाचे प्रदान सचिव भूषण गगराणी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले असून गावोगावी असे प्रकल्प व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सातत्याने दोन वर्ष भिलार गावकरी उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते. भिलारच्या ग्रामस्थांनी राहत्या घरी साहित्य केंद्रांचा समावेश करण्याला ग्रामसभेत एकमुखाने संमती देण्यात आली.

 

 


इंग्लंडमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर उभारण्यात आलेलं भिलार भारतातील पहिलंच पुस्तकांचं गाव ठरलं आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी स्वतः या प्रकल्पात उत्साहानं लक्ष घातलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गावाचं उद्घाटन होत आहे. आता भिलारनंतर कोकणात गणपतीपुळ्याजवळच्या केशवसुतांच्या जन्मगावी मालगुंडला दुसरं पुस्तकांचं गाव उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. विनोद तावडे यांनी या खात्यांचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मराठी भाषा, साहित्य, वाचन संस्कृती आदी क्षेत्रांत सातत्याने वेगवेगळ्या, अभिनव कल्पना राबवल्या आहेत.

 

बाबा भांड यांची प्रतिक्रिया 

वाचकांची प्रतिक्रिया....

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai
Top