Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भीषण दुर्घटना! इंडोनेशियातील प्रवासी फेरीला आग; पाच जणांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता, बचाव पथकांद्वारे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

भीषण दुर्घटना! इंडोनेशियातील प्रवासी फेरीला आग; पाच जणांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता, बचाव पथकांद्वारे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

जकार्ता (Indonesia Ferry Fire) : इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी एका प्रवासी फेरीला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. ही फेरी सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीतील मकासर शहराकडे जात होती.

दुर्घटनेच्या वेळी फेरीवर २७१ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य प्रवास करत होते. (Indonesia Ferry Fire)

या दुर्घटनेत आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून २२५ जणांची सुरक्षित सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मात्र, ४१ जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध व बचाव संस्थेने घटनास्थळी बचाव नौका, हेलिकॉप्टर आणि विशेष पथके तैनात केली आहेत. जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारणाऱ्या अनेक प्रवाशांनाही सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात आले. (Indonesia Ferry Fire)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फेरीच्या वरच्या डेकमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना आणि आग संपूर्ण जहाजभर वेगाने पसरताना दिसत आहे. अनेक प्रवासी लाइफ जॅकेट घालून मदतीची वाट पाहत असल्याचे, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. (Indonesia Ferry Fire)

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून बेपत्ता प्रवाशांचा शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Indonesia Ferry Fire)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai