बारामती : (Congress vs Parth Pawar) बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पार्थ पवार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. काँग्रेसने पार्थ पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अत्यंत जहरी शब्दांत टीका केली आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत पार्थ पवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला होता. त्याचवेळी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केल्यामुळे 'हा काँग्रेसचा डाऊनफॉल आहे' असा दावा पार्थ पवार यांनी केला होता. (Congress vs Parth Pawar)
काँग्रेसचं प्रत्युत्तर काय?
या टीकेला उत्तर देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सोशल मीडियावरून थेट हल्ला चढवला. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटमध्ये पार्थ पवारांवर वैयक्तिक टीका करण्यात आली असून, 'धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं जरा जास्तच नाही का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर शांत राहणारा, महाशक्तीसमोर सरेंडर झालेला हा कृतघ्न मुलगा काँग्रेसबद्दल बोलू नये,' असा घणाघात काँग्रेसने केला आहे. (Congress vs Parth Pawar)
या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे? (Congress vs Parth Pawar)

