नवी दिल्ली: (IMD Rain Alert Monday India) देशातील विविध राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व, ईशान्य आणि पश्चिम भारतासह किनारपट्टीच्या भागांत जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे.
ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यासोबतच अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि 'थंडरस्क्वॉल'चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (IMD Rain Alert Monday India)
उत्तर अन् मध्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज
राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता असून, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादमध्ये मुसळधार पावसाचा आणि मेघगर्जनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये विशेषत: विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि ओडिशा येथेही जोरदार पावसाची शक्यता आहे. (IMD Rain Alert Monday India)
महाराष्ट्रात कशी असेल स्थिती?
कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर आणि काही भागांत मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (IMD Rain Alert Monday India)
दक्षिण भारतात ७० किमी/तास वेगाने वादळी वाऱ्यांचा इशारा
उत्तर आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असून, वाऱ्याचा वेग प्रतितास ७० किमीपर्यंत पोहोचू शकतो. हवामान विभागाने येथे 'थंडरस्क्वॉल'चा इशारा दिला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. (IMD Rain Alert Monday India)

