Dailyhunt
Dombivli BJP Celebration : भाजपाच्या विजयाचा कल्याण जिल्ह्याच्या वतीने साजरा केला आनंद

Dombivli BJP Celebration : भाजपाच्या विजयाचा कल्याण जिल्ह्याच्या वतीने साजरा केला आनंद

डोंबिवली : (Dombivli BJP celebration) पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळाल्याचा आनंद भाजपा कल्याण जिल्हयाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.

डोंबिवलीतील इंदिरा चौकात भाजपाच्या वतीने विजयाचा आनंद साजरा केला.

यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक शशिकांत कांबळे, मितेश पेणकर, बाळा पवार, अभिजीत थरवळ, संतोष केणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.(Dombivli BJP celebration)

शशिकांत कांबळे यांनी सांगितले, संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांसाठी आणि समर्थकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची दहशत उलटवून टाकण्याचे काम मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी केले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, रविंद्र चव्हाण या सर्वानी त्याठिकाणी घेतलेली मेहनत यामुळे आज इतिहास घडला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री पहिल्यांदा बसत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आसाम मध्ये सुध्दा पुन्हा भाजपाचे सरकार आले आहे. त्यामुळे खूपच आनंदाचा दिवस आहे असे सांगितले.(Dombivli BJP celebration)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai