Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेसकडून ADAPTISचे अनावरण; व्यावसायिकांसाठी पेमेंट आणि कॉमर्सचे एकात्मिक व्यासपीठ

एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेसकडून ADAPTISचे अनावरण; व्यावसायिकांसाठी पेमेंट आणि कॉमर्सचे एकात्मिक व्यासपीठ

मुंबई : (NTT DATA Payment Services) भारतातील डिजिटल कॉमर्स वेगाने विस्तारत असताना व्यापाऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन NTT DATA पेमेंट सर्व्हिसेस इंडियाने ADAPTIS हा एकात्मिक पेमेंट आणि कॉमर्स सेवा ब्रँड सुरू केला आहे.

या माध्यमातून कंपनीने पेमेंट स्वीकारणे, मर्चंट सोल्यूशन्स, व्हॅल्यू-अॅडेड सर्व्हिसेस आणि कॉमर्स क्षमता एकाच ब्रँडखाली आणल्या आहेत.

ADAPTIS हे स्थानिक व्यावसायिक, सुक्ष्म लघू व मध्यम उद्योगांसह मोठ्या उद्योगांसाठी विकसित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून पेमेंट स्वीकारणे, व्यवसायाचे कामकाज अधिक कार्यक्षमपणे हाताळणे, ग्राहकांना अखंड अनुभव देणे आणि संपूर्ण व्यावसायिक व्यवहार एकाच व्यासपीठावरून व्यवस्थापित करणे शक्य होणार आहे.(NTT DATA Payment Services)

NTT DATA पेमेंट सर्व्हिसेस इंडियाचे होल-टाईम डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ताकेओ उएनो यांनी सांगितले की, भारत हा कंपनीच्या प्रादेशिक विकास धोरणातील अत्यंत महत्त्वाचा बाजार आहे. डिजिटल पेमेंटचा वाढता स्वीकार आणि व्यापाऱ्यांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन जागतिक अनुभव आणि स्थानिक गरजांचा समन्वय साधत सुरक्षित, ग्राहक-केंद्रित आणि आधुनिक कॉमर्स सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याचा ADAPTIS चा उद्देश आहे.(NTT DATA Payment Services)

NTT DATA जपानचे ग्लोबल पेमेंट्स स्ट्रॅटेजी अँड ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे प्रमुख शिनिचिरो निशिकावा यांनी सांगितले की, विविध बाजारपेठांमध्ये एकसंध पेमेंट आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म उभारण्याच्या कंपनीच्या धोरणातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक गरजांनुसार लवचिकता राखत व्यापाऱ्यांना सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या सेवा देण्यावर भर दिला जाईल.(NTT DATA Payment Services)

NTT DATA पेमेंट सर्व्हिसेस इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी राहुल जैन यांनी सांगितले की, ADAPTIS मुळे कंपनीच्या विविध सेवा एकाच ब्रँडखाली एकत्र आल्याने भागीदारांना अधिक मूल्य मिळेल आणि देशभरातील व्यापाऱ्यांच्या बदलत्या गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करता येईल.(NTT DATA Payment Services)

ADAPTIS अंतर्गत चार प्रमुख सेवा

•ADAPTIS In-Store - ऑफलाइन किरकोळ व्यापारासाठी पेमेंट सोल्यूशन्स

•ADAPTIS E-Commerce - सुरक्षित ऑनलाइन पेमेंट सुविधा

•ADAPTIS Enterprise - मोठ्या उद्योगांसाठी पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर व व्यवसाय उपाय

•ADAPTIS VAS (Value-Added Services) - व्यवसाय कार्यक्षमता आणि ग्राहक सहभाग वाढवणाऱ्या सेवा

सुमारे दोन दशकांचा अनुभव असलेल्या NTT DATA पेमेंट सर्व्हिसेस इंडिया कंपनीकडून सध्या देशभरातील लाखो व्यापाऱ्यांना सेवा दिली जाते. PCI-DSS अनुरूप सुरक्षित तंत्रज्ञानाच्या आधारे कंपनी दरवर्षी १०० दशलक्षांहून अधिक व्यवहारांवर प्रक्रिया करते.(NTT DATA Payment Services)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai