Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
EPFO सदस्यांसाठी खूशखबर! आता फक्त ४८ तासांत खात्यात जमा होणार PF चे पैसे; जाणून घ्या सविस्तर माहिती

EPFO सदस्यांसाठी खूशखबर! आता फक्त ४८ तासांत खात्यात जमा होणार PF चे पैसे; जाणून घ्या सविस्तर माहिती

वी दिल्ली: (EPFO PF Withdrawal 48 Hours) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या करोडो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे.

ऑनलाइन क्लेम सादर केल्यानंतर बहुतांश प्रकरणांमध्ये अवघ्या ४८ तासांत पीएफची रक्कम थेट सदस्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. (EPFO PF Withdrawal 48 Hours)

ऑटो-सेटलमेंटमुळे प्रक्रिया सुलभ; ९०% दावे मंजूर

नवीन संगणकीय प्रणालीमुळे ९० टक्के दावे आता 'ऑटो-सेटलमेंट' मदतीने मंजूर होत आहेत. रमेश कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केले की, पीएफमधून पैसे काढणे आता म्युच्युअल फंडातील रक्कम काढण्यापेक्षाही जास्त सोपे झाले असून यामुळे कर्मचाऱ्यांना आठवडे वाट पाहावी लागणार नाही. (EPFO PF Withdrawal 48 Hours)

BHIM आणि UPI द्वारे मिळणार पीएफचे पैसे

ईपीएफओ लवकरच डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार करणार आहे. पुढील एका महिन्याच्या आत BHIM ॲपच्या मदतीने पीएफ क्लेम सेटलमेंटची सुविधा सुरू करण्याची शक्यता आहे. मंजूर झालेली रक्कम थेट सदस्यांच्या UPI-लिंक्ड बँक खात्यात तात्काळ जमा केली जाईल. (EPFO PF Withdrawal 48 Hours)

गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा अन् व्याजाचा अपडेट

डिलिव्हरी बॉय, गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच देण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजनेवर काम करत आहे. सध्या ईपीएफओवर ८.२५ टक्के व्याज दिले जात आहे. ३ जुलैपर्यंत ३४ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यांमध्ये १.४४ लाख कोटी रुपयांचे व्याज जमा करण्यात आले आहे. व्याजदरात वाढ करण्याबाबत सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाही, असेही कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केले. (EPFO PF Withdrawal 48 Hours)


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai