Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गिरगावातील वीज समस्येवर लोढा यांचा इशारा

गिरगावातील वीज समस्येवर लोढा यांचा इशारा

मुंबई: (Mangal Prabhat Lodha) गिरगाव परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी प्रभावित भागांची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनी दिला आहे.

मरीन लाइन्स पुलाजवळील बेस्टच्या ३३ हजार व्होल्ट क्षमतेच्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ही वाहिनी रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्तीस वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पर्यायी व्यवस्थेद्वारे ११ हजार व्होल्ट वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.

नागरिकांच्या तक्रारींसाठी गायवाडी येथे बेस्टची विशेष बस तैनात करण्यात येणार असून दुरुस्तीच्या कामांमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील आठवडाभरात डी आणि सी विभागासाठी स्वतंत्र दुरुस्ती पथके कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

हेही वाचा : बंदी असूनही रस्त्यावर नमाज; यूपीत ४० जणांविरोधात गुन्हा दाखल!

गिरगावातील वाढत्या वीज मागणीचा अभ्यास करून भविष्यात अतिरिक्त उपकेंद्रे उभारण्याबाबत विचार केला जाणार आहे. गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे मंगलप्रभात लोढा आणि तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.(Mangal Prabhat Lodha)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai